ट्रकचालकाने केला १४ लाखांच्या शेतमालाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 04:53 PM2018-02-23T16:53:47+5:302018-02-23T16:53:53+5:30

नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेले १४ लाख रुपयांचे द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 nashik,Truck,driver,forteen,lakh,grapes,theft | ट्रकचालकाने केला १४ लाखांच्या शेतमालाचा अपहार

ट्रकचालकाने केला १४ लाखांच्या शेतमालाचा अपहार

Next
ठळक मुद्देपंचवटी पोलीस ठाणे : १४ लाखांची १९ टन द्राक्षे व डाळींबाचा अपहार

नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेले १४ लाख रुपयांचे द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट व्यवसायिक करण भट (रा़ समर्थ पार्क, तारवालानगर, दिंडोरी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे़ १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांनी बारा टायरच्या ट्रकमध्ये (पीबी०२, सीसी ९४४५) १४ लाख २३ हजार २७० रुपयांची १९ टन द्राक्षे व डाळींब भरले व ट्रकचालकास कोणत्या ठिकाणी हा माल घेऊन जायचा त्याबाबत सांगितले़

मात्र, ट्रकचालकाने १९ टन द्राक्षे व डाळींबे ही सांगितलेल्या ठिकाणी घेऊन गेलाच नाही़ याबाबत भट यांनी संबंधित ठिकाणी मालाची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठून ट्रकचालकाविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली़

Web Title:  nashik,Truck,driver,forteen,lakh,grapes,theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.