भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:04 AM2019-05-12T01:04:30+5:302019-05-12T01:04:45+5:30

महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली.

 Nashikkar Shrote Delan in a concert of devotional songs | भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन

भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन

Next

नाशिक : महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली. निमित्त होते, मुंबईच्या श्रीकांत कोटूरवार यांच्या मैफलीचे.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प मुंबईच्या श्रीकांत कोटूरवार व नाशिकच्या आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने गुंफण्यात आले. बाबूराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भक्तिगीत मैफलीची सुरुवात गणरायाच्या आराधनेतून करण्यात आली.
माधवा मधुसुदना, मनमोहना रे मधुसुदना, विठ्ठल हरी विठ्ठला, मन से कहो, सुंदरानना सुंदरानना नारायणा..., भोले की जय-जय, शंकराय शंकराय... अशा भक्तिपर गीतांनी मैफल उत्तरोत्तर खुलत गेली. गायक कोटूरवार, कनन अय्यर, ऋषिकेश कुलकर्णी, गिरीश बालातील यांनी गीतगायन केले.  मंदार सोमण (संवादिनी), हरीश  परमार (तबला) यांनी साथसंगत केली.
आजचे व्याख्यान
गीत मैफल : वेणुनाद शब्द
सूर-संवाद त्रिवेणी स्वरानुभव

Web Title:  Nashikkar Shrote Delan in a concert of devotional songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.