अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:17 PM2018-12-06T17:17:16+5:302018-12-06T17:20:58+5:30

नाशिक : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक ...

nashik,gharkul,yojana,from,encroachment | अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

Next
ठळक मुद्दे२५ हजार कुटूंबाना लाभ : नव्या वर्षात होणार गृहप्रवेश

नाशिक: शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येतात. जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली घरे अधिकृत करण्यात करण्याची कारवाई सुरू असून नाशिक जिल्ह्यात सुमारे २५ हजार कुटूंबांना याचा लाभ होणार आहे.
ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर निवासासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियतिम करण्याच्या धोरणांतर्गत जिल्ह्यातील अतिक्र मणांची नोंद घेण्यात आली असून जिल्हयात ४९२ ग्रामपंचायतीमध्ये जवळपास २४,६०० नोंदी झाल्या आहेत. यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणुन ग्रामपंचायत स्तरावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारची २५,४३४ अतिक्रमणे आहेत. संगणकीय प्रणालीवर अतिक्र मणधारकांच्या नोंदीबाबत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतच्या हरकती नोंदविल्या आहेत. जिल्हयात जवळपास २४,६०० नोंदी झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक, दर्शनी भागात अतिक्र मणधारकांची यादी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.
या योजनेतंतर्गत जवळपास ९३ टक्के काम पुर्ण झाले असून २५ हजाराच्या जवळपास अतिक्रमणांचा मुद्या निकाली निघालेला आहे. यामुळे संबंधितांना दिलासा मिळाला असून शासनाची योजनाही या माध्यमातून पुर्णत्वास येणार आहे. ज्या जमिनींवर अतिक्रमणे आहेत आणि मोठा जनसमुदाय असेल अशी ही घरे असल्यामुळे त्यांचा विचार करून अतिक्रमण नियमित करण्याबाबतचे धोरण शासनाने घेतले आहे.

Web Title: nashik,gharkul,yojana,from,encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.