प्रियकराच्या पत्नीला सर्पदंश करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:59 PM2018-03-30T22:59:05+5:302018-03-30T22:59:05+5:30

: प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

nashik,boy's,wife,tried,snake,bite | प्रियकराच्या पत्नीला सर्पदंश करण्याचा प्रयत्न

प्रियकराच्या पत्नीला सर्पदंश करण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देगुन्हा  दाखल : दोन वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा उलगडा दोन वर्षभरानंतर वाचा फुटली; मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल

नाशिक : प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयितांना मात्र अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.
प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी संशयित पल्लवी भालेराव हिने सर्पमित्र संशयित किरण गांगुर्डे याच्या मदतीने प्रियकाराच्य पत्नीच्या वडाळारोडवरील हिवरेनगर येथील घरात घुसून तिच्या अंगावर सर्प सोडला आणि तेथून पळ काढला. सर्पाने पत्नीच्या डाव्या हाताला दोनदा डंख मारल्याने पत्नी या घटनेत जखमी झाली. तिला नंतर रुग्णालायात दाखल करण्यात आल्यानंतर सुदैवाने ती यातून बचावली. मात्र तिच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. या घटनेप्रकरणी पीडित पत्नीने दोन वर्षांनंतर मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, पल्लवी भालेराव आणि किरण गांगुर्डे यांच्या विरोधात  संशयित म्हणून फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: nashik,boy's,wife,tried,snake,bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.