सोमवारपासून नाशिककरांना हेल्मेट घालावेच लागणार; 26 नाक्यांवर कारवाईची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:37 PM2019-05-12T15:37:17+5:302019-05-12T15:45:01+5:30

बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी व रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने हेल्मेट सक्तीची मोहिम राबविली जाणार असल्याचे नखाते म्हणाले. केवळ हेल्मेट सक्तीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे नाही,

Nashik will have to add helmets from Monday; Penal action on 130 nos | सोमवारपासून नाशिककरांना हेल्मेट घालावेच लागणार; 26 नाक्यांवर कारवाईची विशेष मोहीम

सोमवारपासून नाशिककरांना हेल्मेट घालावेच लागणार; 26 नाक्यांवर कारवाईची विशेष मोहीम

Next
ठळक मुद्दे520 पोलीस तैनात राहणार शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम

नाशिक : शहरात तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्ते अपघातात डोक्याला गंभीर मार लागून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस ठाणे मिळून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर संयुक्त कारवाईची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून (दि.१३) शहरातील 26 नाक्यांवर हेल्मेट न परिधान करता दुचाकी चालविणाऱ्यांसह सीटबेल्ट न वापरणा-या मोटारचालकांची धरपकड करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी एकूण 520पोलीस तैनात राहणार आहे.
सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदीचे एकूण 26नाके निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येकी पोलीस ठाणेनिहाय दोन पॉइंटनुसार वीस नाके ठरविण्यात आले आहेत. यानुसार एका पोलीस ठाण्याला प्रत्येकी ३० कर्मचारी आणि १० वाहतूक पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. मोहिमेचे नियंत्रण प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तसेच वाहतून शाखेच्या निरिक्षकांकडून पॉइंटनुसार केले जाणार आहे. ही मोहीम केवळ पाच ते साडेपाच तास चालणार आहे. दुपारी एक वाजता मोहिम संपणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले.
--
मुळ कागदपत्रे बाळगण्याचे आवाहन
बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी व रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने हेल्मेट सक्तीची मोहिम राबविली जाणार असल्याचे नखाते म्हणाले. केवळ हेल्मेट सक्तीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे नाही, तर अन्य प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूध्दही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी नियमांचे पालन करत वाहनाचे मुळ कागदपत्रे, परवाना सोबत बाळगावा, असे पोलिसांनी केले आहे.

Web Title: Nashik will have to add helmets from Monday; Penal action on 130 nos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.