नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 01:59 PM2018-02-02T13:59:57+5:302018-02-02T14:01:40+5:30

महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाविद्यालय बंद ठेऊन राज्यभर जेलभरो आंदोलन केले करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालय येथे शिक्षण उपसंचालक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे .

Nashik: Jail Bharo movement of the College Teachers Association | नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन

नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाविद्यालय बंद ठेऊन राज्यभर जेलभरो आंदोलन केले करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालय येथे शिक्षण उपसंचालक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे . शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल , असा इशारा संघाचे राज्य सरचिटणीस प्रा. एच. के . शिंदे यांनी दिला आहे.
 जिल्हाभरातील सर्व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक आज कामकाज बंद ठेवणार आहे.त्याचप्रमाणे नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता सर्व शिक्षक एकत्र जमणार आहे , यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे प्रा.शिंदे यांनी सांगितले . यापूर्वी तहसीलदार , जिल्हाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केले आहे . शुक्रवारी आंदोलनाचा चौथा टप्पा असून मागणी मान्य न झाल्यास बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकला जाणार असून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक गैरसोईला शासन जबाबदार राहील , असे कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Nashik: Jail Bharo movement of the College Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.