नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:23 PM2017-12-12T15:23:25+5:302017-12-12T15:24:37+5:30

In the name of Narayan Rane | नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

Next
ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक : सर्वपक्षीयांचा सावध पवित्राराणे यांनी देखील नाशिकमधून उमेदवारीबाबत होणारी चर्चा निरर्थक नसल्याचे म्हटल्यामुळे येणा-या काळात त्याभोवतीच राजकारण फिरण्याचे संकेत आहेत.

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, खुद्द भाजपाकडून इच्छूक असलेल्या किंबहुना गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने या बाबत सावध पवित्रा घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, राणे यांनी देखील नाशिकमधून उमेदवारीबाबत होणारी चर्चा निरर्थक नसल्याचे म्हटल्यामुळे येणा-या काळात त्याभोवतीच राजकारण फिरण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय पक्षांचे बलाबल स्पष्ट झाले असून, नजिकच्या काळात त्यात आता कोणतीही भर पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याच्या बळावरच सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात शिवसेना सर्वात पुढे व दुस-या क्रमांकावर भाजप असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस अनुक्रमे तिस-या व चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने यापुर्वीच भाजपासोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचे जाहीर केल्यामुळे साहजिकच सेना व भाजपा परस्पर विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले वर्चस्व पाहता अनेकांनी त्यावर दावेदारी करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभुत झालेले शिवाजी सहाणे यांनी तर गेल्या निवडणुकीपासूनच स्वत:ची उमेदवारी एकतर्फी घोषित करून टाकली आहे. त्यात आता जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भर पडली आहे. पक्षीय निष्ठेच्या निकषाचा विचार केल्यास सहाणे हे दराडेपेक्षा उजवे ठरू शकतात कारण दराडे यांची राजकीय भुमिका सोयीस्कररित्या आजवर बदलत आल्याने भविष्यातही ते सेनेसोबत राहतीलच याची खात्री पक्षाला नाही. त्यातच राणे यांचे नाव पुढे आल्यास सेनेचे किती मतदार सदस्य निष्ठावान राहतील याविषयी खुद्द सेनेलाच शाश्वती नसल्यामुळे निवडणुकीत ‘रिस्क’ घेणा-यालाच उमेदवारी मिळू शकते.
नारायण राणे यांच्यामुळे भाजपातील इच्छूकांचीही घालमेल वाढली आहे. पक्ष सत्तेवर आल्यापासून अनेकांना त्यांनी विधानपरिषदेचा शब्द देऊन ठेवल्यामुळे अशा सर्वांचाच हिरमोड होणे स्वाभाविक आहे. अगदी त्र्यंबकच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाच्या वळचणीला गेलेले राष्ट्रवादीचे परवेज कोकणी यांना तर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीच शब्द दिल्याचा छातीठोक दावा कोकणी समर्थक करीत आहेत.

Web Title: In the name of Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.