फायनान्स कार्डच्या ओटीपीद्वारे परस्पर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:28 AM2018-05-20T00:28:17+5:302018-05-20T00:28:17+5:30

बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत कार्डच्या नंबरवरून ओटीपी मिळवित फ्लिपकार्डच्या माध्यमातून २२ हजार रुपयांची परस्पर खरेदी करून चुंचाळे शिवारातील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 Mutual purchase of finance card by OTP | फायनान्स कार्डच्या ओटीपीद्वारे परस्पर खरेदी

फायनान्स कार्डच्या ओटीपीद्वारे परस्पर खरेदी

Next

नाशिक : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत कार्डच्या नंबरवरून ओटीपी मिळवित फ्लिपकार्डच्या माध्यमातून २२ हजार रुपयांची परस्पर खरेदी करून चुंचाळे शिवारातील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  अंबड पोलीस ठाण्यात धनाजी दिवेकर (रा़चुंचाळे शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ मे रोजी दुपारी त्यांच्या मोबाइलवर संशयिताचा फोन आला़ या व्यक्तीने बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून तुमच्याकडे बजाज फायनान्सचे कार्ड आहे का? अशी विचारणा करून कार्डवरील चार नंबर सांगितले़ त्यामुळे दिवेकर यांना त्याच्याबाबत विश्वास वाटल्याने त्यांनी कार्डवरील ओटीपी संशयितास पाठविला़ यानंतर दोन तासांनी बजाज फायनान्समधून फोन आला व त्यांनी तुम्ही आॅनलाइन वस्तू खरेदी केली आहे का? अशी विचारणा केली़  यानंतर दिवेकर यांनी मोबाइलवर आलेला संदेश बघितला असता त्याच्या खात्यातून फ्लिपकार्टद्वारे २२ हजार ९९० रुपयांची खरेदी करून फसवणूक केल्याचे समोर आले़ यानंतर दिवेकर यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून अज्ञात संशयिताविरोधात फिर्याद दिली़

Web Title:  Mutual purchase of finance card by OTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.