मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील हमालांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:40 PM2018-01-24T23:40:37+5:302018-01-25T00:04:18+5:30

जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा परवाना वारसांच्या नावे करण्यासंदर्भात रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 The movement of the Hammalas movement on Manmad junction railway station | मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील हमालांचे धरणे आंदोलन

मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील हमालांचे धरणे आंदोलन

Next

मनमाड : जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा परवाना वारसांच्या नावे करण्यासंदर्भात रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.  प्रवाशांचे सामान घेऊन जाणाºया परवानाधारक ६५ हमालांनी असंघटित श्रमिक कामगार युनियनचे नेते बळवंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २४) अचानक आंदोलनाचा पवित्रा घेत रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकिंग आॅफिस येथे धरणे आंदोलन सुरू केले.  हमालांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना सामान स्वत: वाहून न्यावे लागत होते. राजू इप्पर, सुनील पाटील, राजू शिंदे, बाळू ढोणे, प्रल्हाद भोसले यांच्यासह हमाल आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक एन. के. मदने, वाणिज्य अधिकरी अनिल  बागले, आरपीएफ अधिकारी रणजित यादव, मधुकर सोनवणे, युनियनचे कार्यकर्ते आझाद आव्हाड आदी उपस्थित होते. 
अशा आहेत मागण्या...
हमाल युनियन जिंदाबादची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परवानाधारक हमाल रेल्वे प्रवाशांच्या सामानाची ने-आण करतो. परवान्यानुसार लायसन्स फी भरत असल्याने रेल्वे बोर्ड खात्याने आमच्या मागण्यांचा विचार करून काही हमालांना रेल्वेच्या सेवेत सामावून गँगमन, ट्रॅकमन म्हणून रु जू केले; मात्र उर्वरित हमालांना अद्यापही रेल्वेच्या सेवेत सामावून घेतलेले नाही. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र विचार केला जात नाही. उर्वरित हमालांना ट्रॅकमन, गँगमन म्हणून रेल्वेत घेण्यात यावे, वयस्कर हमालांना पेन्शन योजना सुरू करावी, वयस्कर हमालांचा परवाना त्यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन स्टेशनमास्तर संजय गलांडे यांना देण्यात आले.

Web Title:  The movement of the Hammalas movement on Manmad junction railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक