मोडाळे उपसरपंचपदी आशाबाई धात्रक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 06:57 PM2019-06-13T18:57:51+5:302019-06-13T18:59:32+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांडेकर यांनी केली.

Mondale sub-panchpanii hopeabai dhantak unceremoniously | मोडाळे उपसरपंचपदी आशाबाई धात्रक बिनविरोध

मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई धात्रक यांच्या निवडीप्रसंगी सर्व पदाधिकारी.

Next
ठळक मुद्दे आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची विशेष बैठक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांडेकर यांनी केली.
बिनविरोध निवडीची सभा ग्रामसंसद कार्यालयात सरपंच मंगला बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली. उपसरपंच पदासाठी आशाबाई संजय धात्रक यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. खांडेकर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी सीताबाई शेंडगे, लंकाबाई ढोन्नर, अंजना बोडके, संतोष बोडके, विमलबाई शिंदे, ज्ञानेश्वर झोले, विठल जगताप उपस्थित होते. गोरख बोडके, रामदास बोडके, गजीराम शेंडगे, बाळासाहेब धात्रक, राहुल बोंबले, किसन बोडके, पांडुरंग धात्रक यांनी अभिनंदन केले.

Web Title: Mondale sub-panchpanii hopeabai dhantak unceremoniously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.