मोदींची विदेशी नेत्यांना झप्पी, देशवासियांना त्रासदायक; नाशिकमध्ये कॉँग्रेस मेळाव्यात मोहन प्रकाश यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 05:46 PM2017-11-26T17:46:53+5:302017-11-26T17:51:36+5:30

मोदी सरकारने सामान्य नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करून त्यांच्या हक्क, अधिकारांवर गंडांतर आणले आहे. त्यामुळे आज संविधान वाचिवण्याची वेळ आली असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले

 Modi's foreign leaders shy, countrymen annoy; Mohan Prakash's criticism of Congress meeting in Nashik | मोदींची विदेशी नेत्यांना झप्पी, देशवासियांना त्रासदायक; नाशिकमध्ये कॉँग्रेस मेळाव्यात मोहन प्रकाश यांची टीका

मोदींची विदेशी नेत्यांना झप्पी, देशवासियांना त्रासदायक; नाशिकमध्ये कॉँग्रेस मेळाव्यात मोहन प्रकाश यांची टीका

Next
ठळक मुद्दे संघाच्या मुख्यालयात कधी तिरंगा फडकविला गेला नाहीगांधी हत्येनंतर मिठाई वाटली त्यांनी आम्हाला देश प्रेम काय शिकवायचे ?

नाशिक :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नोट बंदी केली. सकाळी जपानच्या पंतप्रधानांची भेट घेतली चालू वर्षी जीएसटी लागू केले.दुसर्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेऊन झप्पी दिली मोदी यांची विदेशी नेत्यांना झप्पी देणे आण िविदेशी नेत्यांच्या तालावर आर्थिक निर्णय घेणे देशातील नागिरीकांना मात्र त्रासदायक ठरत असल्याची टीका प्रदेश काँगेसचे नेते मोहन प्रकाश यांनी केली आहे.
सध्याच्या मोदी सरकारने सामान्य नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करून त्यांच्या हक्क, अधिकारांवर गंडांतर आणले आहे. त्यामुळे आज संविधान वाचिवण्याची वेळ आली असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. नाशिक शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते ज्या संघाच्या मुख्यालयात कधी तिरंगा फडकविला गेला नाही. गांधी हत्येनंतर मिठाई वाटली त्यांनी आम्हाला देश प्रेम काय शिकवायचे असा प्रश्न करून मोहन प्रकाश यांनी मोदी यांनी नोट बंदी आण िकरून देशाची अर्थ व्यवस्थेवर आघात केल्याचा आरोप केला. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, भाई नागराळे, आमदार निर्मला गावित आदी उपस्थित होते

Web Title:  Modi's foreign leaders shy, countrymen annoy; Mohan Prakash's criticism of Congress meeting in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.