टाकळी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:15 AM2019-07-14T00:15:32+5:302019-07-14T00:34:17+5:30

टाकळीतील गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Minor girl raped in Takli | टाकळी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

टाकळी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देएकाविरुद्ध गुन्हा ; ठार मारण्याची धमकी

नाशिकरोड : टाकळीतील गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आई-वडिलांसमेवत या मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तिचा आशय असा की मुलगी परिसरातील शाळेत आठवीत असताना सनी कैलास म्हस्के (रा. गांधीनगर) हा तिला भेटायला येत असे. दोघांची मैत्री झाली. म्हस्के मुलीला गोड बोलून लग्नाचे आश्वासन देत जवळीक साधत होता. नकार दिल्यावर म्हस्के लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने अत्याचार करत असे. २ जून १९ रोजी दुपारी बाराला मुलगी मैत्रिणीकडून शिवण क्लास संपवून घरी पायी जात असताना म्हस्केने तिला गाठले. लग्नाबद्दल बोलायचे आहे असे सांगून पुन्हा गांधीनगरमधील पडीक इमारतीत घेऊन गेला. मुलीने नकार दिल्यानंतर म्हस्केने सांगितले की, माझ्या मोबाइलमध्ये तुझे अश्लील फोटोचे रेकार्डिंग आहे. मी तुझी बदनामी करीन. म्हस्केने पीडितेवर बलात्कार केला व तिला तिच्या घराजवळ सोडले.
या घटनेनंतर म्हस्केने चार दिवसांनी मुलीला फोन करून आपले लग्न ठरल्याचे सांगितले. मला विसरून जा, माझ्या लग्नात अडथळा आणू नको, अन्यथा बदनामी करीन असा दमही दिला. ११ जुलैला म्हस्केच्या शेजारी राहणाऱ्या मुलाने पीडित मुलीला म्हस्केचे लग्न झाल्याचे सांगितले. मुलीने त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता म्हस्केने तिला बदनामी करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. झाले गेले विसरून जाण्याचा सल्ला दिला. मुलीने आई-वडिलांना सदर प्रकार सांगितला. तसेच त्यांच्यासमवेत उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Minor girl raped in Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.