मनमाडला शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:15 AM2018-03-03T00:15:25+5:302018-03-03T00:15:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले.

A meeting of peace committee in Manmad | मनमाडला शांतता समितीची बैठक

मनमाडला शांतता समितीची बैठक

googlenewsNext

मनमाड : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले.
रविवारी (दि. ४) तिथीनुसार साजºया होणाºया शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील हांडगे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे, ए. एच. शेख उपस्थित होते.
विविध पदाधिकाºयांनी उत्सव व मिरवणूक काळात येणाºया अडचणींवर चर्चा केली. मनमाड शहराला एकात्मतेची वेगळी परंपरा असून, सर्वधर्मियांचे सण, उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा राखून साजरे केले जातात. होणारी शिवजयंती त्याचप्रमाणे शांततेत साजरी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शांतता समिती सदस्यांनी मनोगतातून दिली. माजी नगराध्यक्ष रहेमान शहा, शिवसेनेचे राजाभाऊ भाबड, रईस फारुकी, एस. एम. भाले, फिरोज शेख, शकुंतला बागुल आदींनी मनोगत व्यक्त केले.  गावठाण भागातील रस्ता दुरुस्तीची कामे सुरू असून, इतर सुविधा पालिकेकडून देण्यात येतील, असे अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे, संतोष बळीद, लियाकत शेख, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, अनिल गुंदेचा, भाजपाचे उमाकांत राय यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: A meeting of peace committee in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस