शेतकºयांचा बाजार समिती कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:17 AM2017-10-27T00:17:53+5:302017-10-27T00:18:05+5:30

उन्हाळ कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापाºयांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले आहेत. व्यापाºयांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी गुरुवारी (दि. २६) येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.

Market Committee Report Attack on Farmers | शेतकºयांचा बाजार समिती कार्यालयावर हल्लाबोल

शेतकºयांचा बाजार समिती कार्यालयावर हल्लाबोल

Next

सटाणा : उन्हाळ कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापाºयांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले आहेत. व्यापाºयांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी गुरुवारी (दि. २६) येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.
बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, सचिव भास्कर तांबे यांनी शेतकºयांच्या भावना समजून घेत ल्या . दिवाळी सणामुळे व्यापाºयांकडे मजुरांची टंचाई असल्यामुळे खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लावता येत नाही. नव्याने कांदा खरेदी केल्यास शासनाला साठेबाजी दिसून येते अशा कात्रीत व्यापारी सापडल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे तब्बल एक तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे उन्हाळ कांद्याला मागणी वाढल्यामुळे भावात तेजी आली आहे. दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी भावात गेल्या तीन दिवसांपासून तेजी राहिली आहे. कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शासनाने पुन्हा व्यापाºयांच्या साठेबाजीवर मर्यादा आणून कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज सटाणा बाजार समिती आवारात व्यापाºयांनी मजूर टंचाईमुळे दररोज दोनशे वाहनेच कांदा खरेदी करण्याची भूमिका घेतली. त्यात एकाच दिवसात सरासरी भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी शेतकरी मनोज सोनवणे, किरण रौंदळ, लक्ष्मण सोनवणे, मोतीराम चौधरी आदी शेतकºयांनी शासनाच्या नावाने व्यापारी कांद्याचे भाव पाडत असल्याचा आरोप केला. दररोज तीनशे ते चारशे वाहने लिलावासाठी येतात; मात्र दोनशे वाहनांच्या वरती कांद्याचा लिलाव केला जात नाही. हा कोणता नियम आहे, असा जाब यावेळी सभापती रमेश देवरे, सचिव तांबे यांना विचारत असतानाच एकाने जिल्हाधिकाºयांनी दोनशे वाहनाच्या वरती कांदा खरेदी करू नये, असे सांगितल्याने गोंधळात अधिकच भर पडली. सभापती देवरे यांनी शेतकºयांच्या भावना समजून घेत त्यांना शांततेचे आवाहन केले. ते म्हणाले की, शासनाने व्यापाºयांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा आणली आहे. त्यामुळे शासनाला दररोज कांदा खरेदीबाबत अहवाल सादर करावा लागत आहे. अशा परिस्थिती दिवाळी सणामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. दिवाळीपूर्वी खरेदी केलेल्या मालाची अद्याप विल्हेवाट लागलेली नाही. त्यात आज कांदा खरेदी केल्यास साठेबाजी दिसून कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने व्यापारी कांदा खरेदी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे सचिव तांबे यांनी सांगितले. शेतकºयांनीदेखील भावाबाबत गोंधळून न जाता टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणल्यास आवक मर्यादित राहून भाव मिळतील, असे आवाहन केले.त्यानंतर आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक किरण अहिरे, लालचंद सोनवणे, वसंतराव सोनवणे, शरद शेवाळे, कारभारी पगार, जिभाऊ मोरकर, साहेबराव सोनवणे, अतुल पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Market Committee Report Attack on Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.