मनमाडला महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:33 AM2019-03-13T01:33:36+5:302019-03-13T01:34:02+5:30

मनमाड शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, येथील श्रावस्तीनगर भागात वीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला.

Manadal Women's Handa Morcha | मनमाडला महिलांचा हंडा मोर्चा

मनमाड येथे पाणीटंचाईने हैराण झालेल्या श्रावस्तीनगर भागातील महिलांनी पालिकेवर काढलेला हंडा मोर्चा.

Next

मनमाड : शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, येथील श्रावस्तीनगर भागात वीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला.
येथील श्रावस्तीनगर भागात पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक तहान भागवत होते; परंतु यंदा शहर परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या भागातील महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी पाणीपुरवठा अधिकारी श्यामकांत जाधव यांना निवेदन दिले. त्यात श्रावस्तीनगर भागात पाइपलाइन टाकून सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. पाइपलाइन टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढली होती ती मंजूरही झालेली आहे. त्यामुळे लवकरच पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जाधव यांनी सांगून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Manadal Women's Handa Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.