स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू; आठवडाभरात दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आवाहन

By Suyog.joshi | Published: April 23, 2024 06:54 PM2024-04-23T18:54:13+5:302024-04-23T18:54:34+5:30

गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईने फ्लूने मृत्यू झाला.

Malegaon woman dies of swine flu Second victim in a week, calls for vigilance | स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू; आठवडाभरात दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आवाहन

स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू; आठवडाभरात दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आवाहन

नाशिक: डेंग्यू, मलेरियाची साथ आटोक्यात येत नाही तोच स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून मालेगावच्या ६५ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईने फ्लूने मृत्यू झाला. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे. आठवडाभरात दुसरा बळी गेल्याने मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून स्वाईन फ्लू संशयित रुगणांचा शोध घेतला जात आहे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेणयाचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी शहरात डेंगूने थैमान घातले होते. परंतु सद्यस्थितीत स्वाईन फ्लूच्या रूपाने शहरवासीयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शहरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. या रुग्णांच्या संपर्कातील रुगणाचे स्वब घेण्यात आले आहेत. सिन्नर आणि मालेगाव येथील दोन्हीही महिला रूग्णांचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
 
सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिलेपाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. रूग्णांना काही लक्षणे जाणवल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा. हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये. घसा खवखवत असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे. - डॉ तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

Web Title: Malegaon woman dies of swine flu Second victim in a week, calls for vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.