मालेगाव मनपात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:59 AM2018-12-06T00:59:34+5:302018-12-06T01:02:06+5:30

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हगणदारीमुक्त शहर व करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन मनपाच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.

Malegaon Manip Officer, Employees Felicitated | मालेगाव मनपात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याबद्दल त्यांना निरोप देताना उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील, मनपा अधिकारी, कर्मचारी.

Next
ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हगणदारीमुक्त शहर व करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन मनपाच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.
येथील महानगरपालिकेत हगणदारीमुक्त शहर, करवसुली, घरकुल योजना व अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सखाराम घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आसीफ शेख, स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील, नगरसेवक नीलेश आहेर, राजाराम जाधव, भिमा भडांगे, उपायुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते.
यावेळी आमदार आसीफ शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त नितीन कापडणीस यांचीही भाषणे झाली. यावेळी हगणदारी मुक्त शहरासाठी योगदान देणारे राजू खैरनार, उमेश सोनवणे, गोकुळ बिरारी, कर वसुलीसाठी लेखाधिकारी कमरूद्दीन शेख, सचिन मार्तंड, कुंदन घुसर, प्रभाग अधिकारी अनिल पारखे, पंकज सोनवणे, किशोर गिडगे, शाम बुरकुल, घरकुल योजनेबाबत शहर अभियंता कैलास बच्छाव, सचिन माळवाड, अग्निशमन दलाचे संजय पवार यांच्यासह कर्मचाºयांना स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.मालेगाव शहर हगणदारीमुक्त करणे मोठे आव्हान होते. परंतु मनुष्यबळ कमी असूनही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या अपार मेहनतीमुळेच हे शक्य झाले व त्यास केंद्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले. आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कर वसुलीचे उद्दिष्ट गाठून मनपाच्या तिजोरीत भर पडली. वर्षानुवर्षे रखडलेली घरकुल योजना पूर्णत्वास नेण्यात यश आले. यामुळे अनेकदा अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडाले. परंतु त्यापलीकडे जात सर्वांचा सहयोग व सहभाग मिळाल्यानेच आज शहरास काही दिले असल्याचे समाधान लाभले.
- संगीता धायगुडे, माजी आयुक्त, मालेगाव मनपा

 

Web Title: Malegaon Manip Officer, Employees Felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.