केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:42 PM2018-01-03T23:42:57+5:302018-01-03T23:43:57+5:30

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

Malegaon declares free of cost from center | केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

Next
ठळक मुद्देसंगीता धायगुडे : राज्य शासनानंतर केंद्र सरकारकडूनही शिक्कामोर्तबप्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरूद्दीन शेख उपस्थित होते. धायगुडे म्हणाल्या की, शहर हागणदरीमुक्त व्हावे यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. शहरात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले. नागरिकांनी खुल्यावर शौचास बसू नये म्हणून आवाहनही करण्यात आले होते. उघड्यावर शौचास बसणाºया ८१ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. शहर हगणदरीमुक्त करणे हे मोठे आव्व्हान होते. मात्र प्रशासनाने घेतलेली मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच शहर हागणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, होमगार्ड, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, बचत गट यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. प्रशासनास नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर रशीद शेख तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्त धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कायमस्वरूपी तरतूदहगणदरीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हगणदारी मुक्त राहावीत यासाठी या ठिकाणी अमृत योजनेतून क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून शहर हगणदरीमुक्त घोषित झाले असले तरी दर सहा महिन्यांनी त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय समितीची पाहणी राज्यस्तरीय समितीच्या पाहणी दौºयानंतर केंद्रास राज्य शासन अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राची समिती पाहणीसाठी आली होती. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहे.

Web Title: Malegaon declares free of cost from center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.