मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:57 AM2018-06-14T00:57:42+5:302018-06-14T00:57:42+5:30

सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता असलेल्या या जलकुंभातून धो-धो पाणी गळती होत होती; परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते.

 Maintenance of Watercolor Repairs | मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती

मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती

Next

नाशिक : सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता असलेल्या या जलकुंभातून धो-धो पाणी गळती होत होती; परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते.२००७ मध्ये गणेशनगर, सद्गुरुनगर आणि खांदवेनगरला लागून असलेल्या पाटाच्या रस्त्यावर बळवंतनगर परिसरात २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ उभारण्यात आला होता; मात्र निकृष्ट बांधकामामुळे काही महिन्यांतच जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीशेजारी छताला लिकेज् झाले. यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत होती. पाण्याच्या गळतीचे प्रमाण इतके होते की, शेजारी असलेला नाला भर उन्हाळ्यात प्रवाहित झाला होता.  याविषयी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात तक्रारी केल्या होत्या; परंतु पाणीपुरवठा विभागाकडून लोकांच्या तक्रारीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात होते. त्याचबरोबर पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून आम्ही दुरुस्ती करीत नसल्याचे अजब कारण प्रशासनाकडून सांगितले जात होते. अखेर ‘लोकमत’मध्ये ‘जलकुंभातून २४ तास धो धो’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने जलकुंभाची दुरुस्ती केली.  या जलकुंभातून गणेशनगर, बळवंतनगर, सद्गुरुनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, आनंदवल्ली, सावरकरनगर, गंगापूर गाव यासह इतर नगरांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करणाºया महापालिकेने पुढच्या काळातही कर्तव्यात कसूर करू नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

Web Title:  Maintenance of Watercolor Repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.