करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:48 AM2018-04-18T00:48:33+5:302018-04-18T00:48:33+5:30

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.

'Mahajan' intermediary to stop the tax break | करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा तोडगा : जनतेचा आवाज ऐकणार; शिक्षण संस्था, शेतकरी, औद्योगिक संघटनांशी करणार चर्चा

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळसाहेब सानप आणि आमदार सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेतली आणि शहरातील करसमस्येविषयी माहिती दिली. महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून सर्व निवासी मिळकती तसेच शेती व औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्षण संस्थांच्या मिळकतींवर करवाढ लागू केली आहे. त्यामुळे कृती समिती, मी नाशिककर अशा विविध नावांखाली संस्थांनी संघटन करून विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील वातावरण सत्तारूढ भाजपाच्या विरोधात जात असून, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आता नाशिकमध्ये आमदार सानप आणि सीमा हिरे सहभागीही झाले आहेत. याशिवाय निमा, आयमा, वकील अशा व्यावसायिकांच्या संघटनांनीदेखील करवाढीच्या विरोधात आंदोलनांना पाठिंबा दिला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांना करवाढीबाबत भाजपाचे शिष्टमंडळे भेटून उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता भाजपा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा धावा सुरू केला आहे. मंगळवारी (दि. १७) याबाबत आमदारद्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शहरात करामुळे निर्माण झालेल्या उद्रेकाविषयी माहिती दिली. त्यावर चालू आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौºयावर येणार असून, ते सर्व शेतकरी, शिक्षण संस्थाचालक, औद्योगिक संघटना आणि अन्य नागरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या भावना आणि अडचणी समजावून घेऊन ते प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे सीमा हिरे यांनी कळविले आहे. महापालिकेने केलेली करवाढ नियमित घरपट्टीत १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बिगरनिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातही भरीव वाढ केली असून, ती ८३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. याशिवाय नवीन मिळकती तसेच खुल्या भूखंडासाठी भाडेमूल्य निश्चित करण्यात आले असून, त्यामुळे नव्या मिळकतींना करवाढीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खुल्या भूखंडावरील करवाढीमुळे शेती क्षेत्रावर कर लागू होणार तो किमान ६५हजार प्रति एकर असेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: 'Mahajan' intermediary to stop the tax break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.