साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:57 AM2018-03-24T00:57:14+5:302018-03-24T00:57:14+5:30

प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

 From the literature, the role of the writer is revealed | साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

साहित्यातून लेखकाची भूमिका प्रकटते

Next

नाशिक : प्रत्येक लेखक हा वैयक्तिक अथवा सामाजिक अनुभवातून अथवा कल्पनातून लेखन करीत असतो. असे लिखाण करताना त्याच्यासमोर बहुधा समाजातील दु:खच अधिक असते. हे समाजातील वास्तव मांडताना लेखक एक भूमिका घेऊन लिहित असतो आणि जरी लिखाणापूर्वी लेखकाची भूमिका स्पष्ट नसली तरी लेखकाच्या साहित्यातून त्याची भूमिका प्रकट होत असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २३) सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे १७८व्या वार्षिक समारंभानिमित्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते विविध वाङ््मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, डॉ. वेदश्री थिगळे, वसंत खैरनार, बी. जी वाघ आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, लेखकाने भूमिका घेऊन लिहावे की लिहू नये, याबाबत वाद आहेत. आपण स्वत: मात्र भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी साहित्यात वास्तववादी लेखनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वानुभवातून लिहिलेल्या लेख नाला वैयक्तिक म्हणावे की सामाजिक, याबाबतही मतभेद आहेत. मात्र, लेखकाच्या लेखनात त्याच्या भूमिकेचे प्रतिबिंब उमटायलाच हवे. समाजात जास्त प्रश्न असतील तेव्हा लेखकाला लिहिण्याची जास्त संधी असते कारण लेखक दु:खाची कहाणी सांगतो. आजची परिस्थिती माणूस म्हणून जगण्यासाठी कठीण आहे. यात लेखक दिलासा देऊ शकतो का, हा माझा प्रयत्न आहे. लेखकाने लोकांसाठी लिहिले पाहिजे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नानासाहेब बोरस्ते यांनी केले. अहवाल वाचन प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले. अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थींचा गौरव
सावानाच्या वार्षिक समारंभात नितीन रिंढे यांना ‘लीळा पुस्तकांच्या’ पुस्तकासाठी डॉ. वि. म. गोगटे स्मृती ललितेतर ग्रंथ पुरस्कार, डॉ. अनघा केसकर यांना ‘दान’पुस्तकासाठी डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, कृष्णा पवार यांना ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकासाठी मु. ब. यंदे पुरस्कार, सुनील जाधव यांना ‘माझं घर’ पुस्तकासाठी पु. ना. पंडित पुरस्कार, हृषिकेश गुप्ते यांना ‘दंशकाल’ पुस्तकासाठी धनंजय कुलकर्णी पुरस्कार, राजीव पटेल यांना ‘लोकनाथ’ पुस्तकासाठी अशोक टिळक पुरस्कार, अनुराधा प्रभुदेसाई यांना ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ पुस्तकासाठी ग. वि. अकोलकर, तर मीना शेटे-संभू यांना ‘वैद्य, हकीम आणि डॉक्टर’ या पुस्तकासाठी स्वा. वि. दा. सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
जांभेकर पुरस्कार
सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे शनिवारी (दि. २४) सुनील चावके यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  From the literature, the role of the writer is revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक