‘त्या’ खतदुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:15 AM2017-08-20T00:15:43+5:302017-08-20T00:16:01+5:30

नाशिक : खते व बियाणे विक्रीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात ज्या जागेवर मद्यविक्री सुरू केल्याप्रकरणी अखेर शनिवारी (दि.१९) कृषी विभागाने संबंधित कृषी विक्रेत्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच ग्रामपंचायतीचा खोटा दाखला जोडल्याप्रकरणी दुसºया कृषी विक्रेत्याचाही परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 The licenses of 'those' fertilizers were suspended | ‘त्या’ खतदुकानांचे परवाने निलंबित

‘त्या’ खतदुकानांचे परवाने निलंबित

googlenewsNext

नाशिक : खते व बियाणे विक्रीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात ज्या जागेवर मद्यविक्री सुरू केल्याप्रकरणी अखेर शनिवारी (दि.१९) कृषी विभागाने संबंधित कृषी विक्रेत्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच ग्रामपंचायतीचा खोटा दाखला जोडल्याप्रकरणी दुसºया कृषी विक्रेत्याचाही परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘लोकमत’नेच सर्वप्रथम याप्रकरणास वाचा फोडली होती. १७ आॅगस्टच्या लोकमतमध्ये ‘परवानगी खतांची अन् विक्री मद्याची’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून घोटीतील कृषी विभागाचा हा प्रताप चव्हाट्यावर आणला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या दाखल्यात छेडछाड करून अन्य एका कृषी विक्रेत्याने कृषी निविष्ठा परवाना मिळविल्याचे उघड केले होते. त्यानंतरही लोकमतने याप्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेऊन या गलथान कारभाराकडे लक्ष वेधले होते. जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी याप्रकरणी इगतपुरी तालुका कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे यांना दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभागाला दोन्ही प्रकरणांचे अहवाल प्राप्त होताच शनिवारी (दि.१९) हेमंत काळे यांनी ग्रामपंचायतीच्या दाखल्यात छेडछाड करणाºया नारायण साबळे यांच्या साई-विश्व अ‍ॅग्रोटेक केंद्रांचा परवाना किटकनाशक कायदा कलम १४ (अ‍े) (बी) खोटे कागदपत्रे सादर केल्याचा ठपका ठेवत कायमस्वरूपी निलंबित केला असून, ३० दिवसांच्या आत कीटकनाशकांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खते व बियाण्यांची विक्री करण्याचा परवाना घेतलेल्या श्री दुर्गा कृषी सेवा केंद्राचाही परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खत विक्रीची जागा बदलल्याची माहिती न देणे व खत विक्रीच्या जागी अन्य वस्तुंची विक्री करण्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.महिलांची तक्राररेल्वे फाटक परिसरातील महिलांनीही ९ मे २०१७ रोजी याप्रकरणी घोटी पोलिसात व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित मद्यविक्री दुकानाविरोधात तक्रार दिली होती. या मद्यविक्री दुकानामुळे महिलांना व मुलींना त्रास होत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते. तक्रार अर्जावर मुक्ता बोराडे, अनिता दुभाषे, चित्रा काळे आदींसह महिलांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  The licenses of 'those' fertilizers were suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.