सोनांबे येथे बिबट्या जेरबंददहशत संपली : परिसरातील शेतकरी, मजुरांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:31 AM2017-12-16T00:31:42+5:302017-12-16T00:32:00+5:30

सोनांबे शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली.

The leopard was destroyed in Sonambi: farmers in the area, labor solutions | सोनांबे येथे बिबट्या जेरबंददहशत संपली : परिसरातील शेतकरी, मजुरांत समाधान

सोनांबे येथे बिबट्या जेरबंददहशत संपली : परिसरातील शेतकरी, मजुरांत समाधान

Next

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली.
सोनांबे शिवारातील सालकडी भागात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर होता. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी जाण्यास शेतकरी व मजूर शेतात जाण्यासाठी घाबरत होते. बिबट्या अनेकांच्या निदर्शनास आल्याने या भागात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सोनांबे येथील सरपंच व पोलीसपाटील यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली होती.
महिन्यापूर्वीच या भागात पिंजरा लावला होता. मात्र त्यात बिबट्या आला नव्हता. गेल्या आठ दिवसांपूर्वी पुन्हा सालकडी भागात वनविभागाने रामनाथ नरहरी शिंदे यांच्या शेत गट क्रमांक ३४२ मध्ये पिंजरा लावला होता. पिंजºयात दोन-तीन दिवस बकरी तर नंतर कोंबडी ठेवण्यात आली होती.
शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पिंजºयाचे फाटक पडल्याचा आवाज शेतकरी शिंदे यांना आला. बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला असावा, असे समजून शिंदे यांनी कोनांबेचे वनपाल ए.के. लोंढे यांना माहिती दिली. पहाटे ६ वाजेपासून पिंजºयात जेरबंद झालेल्या बिबट्याने डरकाळ्या फोडण्यास प्रारंभ केला. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लोंढे यांच्यासह वनरक्षक ए. के. रूपवते, ज्ञानदेव भांगरे, गणपत मेंगाळ, पंढरीनाथ डावखरे यांनी घटनास्थळी येऊन पिंजºयासह बिबट्याला सुरक्षितस्थळी हलविले. सिन्नर तालुक्यात पश्चिम पट्ट्यात अनेक भागात बिबट्या निदर्शनास येत असल्याने वनविभागाची धावपळ सुरू आहे.

Web Title: The leopard was destroyed in Sonambi: farmers in the area, labor solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ