बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:38 PM2019-02-21T13:38:03+5:302019-02-21T13:39:25+5:30

नांदूरवैद्य : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातील जुंद्रे मळा परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून निवृत्ती भिमा जुंद्रे यांच्या दोन गायींवर गुरु वारी रोजी पहाटे तीन वाजता बिबट्याने हल्ला चढवत एका गायीला ठार केले असून एक गाय पलायन करून आपला जीव वाचिवण्यात यशस्वी ठरली.

Leopard killed the cow | बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

Next

नांदूरवैद्य : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातील जुंद्रे मळा परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून निवृत्ती भिमा जुंद्रे यांच्या दोन गायींवर गुरु वारी रोजी पहाटे तीन वाजता बिबट्याने हल्ला चढवत एका गायीला ठार केले असून एक गाय पलायन करून आपला जीव वाचिवण्यात यशस्वी ठरली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहशिंगवे परिसरात याआधी देखील अनेकदा बिबट्याने येथील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आदी पशू फस्त केल्याच्या घटना घडल्या असून अनेक वेळा वनविभागाला कळवूनही साफ दुर्लक्ष करत अजूनही या भागात पिंजरा लावण्यात आलेला नसल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.पहाटे तीन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायींवर हल्ला चढविल्याने एक गाय ठार झाली तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले. यानंतर येथील शेतकरी निवृत्ती जुंद्रे हे सकाळी उठल्यानंतर गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आली.यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरडाओरड केली.परंतु तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता व एक गाय पळून जावून आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाली. यानंतर सदर घटनेची माहिती सरपंच संतोष जुंद्रे यांनी देवळाली पोलिस ठाण्याला दुरध्वनीवरून दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचे शेतकरी जुंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Leopard killed the cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक