सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 04:29 PM2019-01-16T16:29:45+5:302019-01-16T16:31:24+5:30

वणी : नाशिक पंचवटी भागातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेणाऱ्या व परमोरी या मुळ गावातील घरातुन गायब झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kidnapping of sixteen year old student | सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण

सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण

Next
ठळक मुद्देवणी : अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

वणी : नाशिक पंचवटी भागातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेणाऱ्या व परमोरी या मुळ गावातील घरातुन गायब झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल सुरेश जाधव (१६) राहणार परमोरी तालुका दिंडोरी हा नाशिक शहरातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेत असुन शिक्षणानिमित्ताने त्याचे वास्तव्य तेथील एका होस्टेलमधे आहे. दरम्यान सुट्यांच्या कालावधीत तो परमोरी या आपल्या मुळ गावी कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. दरम्यान निखिलचा भाऊ राहुल व वडील हे कामानिमित्त बाहेर गेलेले व आई बाजारासाठी लखमापुर येथे गेली असताना सायंकाळी सर्व घरी परतले त्यावेळी निखिल हा घरात नसल्याचे निदर्शनास आले. आजुबाजुला व नातेवाईक मित्र-परीवार यांचेकडे शोध घेतला मात्र निखिल बद्दल कोणतीही समाधानकारक माहीती मिळाली नाही.
काळजीत पडलेल्या कुटुंबाने पोलीसांत धाव घेतली व घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने निखिलला पळवुन नेल्याची तक्र ार त्याचा भाऊ राहुल जाधव यानी पोलिसांना दिल्याने सदर विद्यार्थ्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kidnapping of sixteen year old student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.