कश्यपीचे पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 07:15 PM2019-03-09T19:15:40+5:302019-03-09T19:16:10+5:30

सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी

Kashyapi was beaten by the officials who left the water | कश्यपीचे पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

कश्यपीचे पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

Next
ठळक मुद्देप्रकल्पग्रस्त आक्रमक : सोमवारच्या बैठकीनंतर होणार निर्णय



लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला. महापालिकेने धरणाच्या पाण्याची जबाबदारी नाकारली असून, ज्यांच्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या गेटवरच अडवून ठेवण्यात आले. अखेर प्रकल्पग्रस्तांशी सोमवारी बैठक घेण्याचे मान्य करत पाणी न सोडताच, पाटबंधारे व पोलीस खाते माघारी परतले.


सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांनीदेखील सकारात्मकता दर्शवून धरणातील पाणी सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे खात्याचे मिसाळ, तांदळे या अधिका-यांनी हरसूल पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त घेऊन कश्यपी धरणाचे पाणी सोडण्यासाठी दाखल झाले. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त धोंडेवाडी, खाड्याची वाडी आदी गावांमध्ये पसरताच, तत्काळ शेकडो प्रकल्पग्रस्तांनी धरणावर धाव घेऊन अधिका-यांना पाणी सोडण्यापासून मज्जाव केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांना मज्जाव करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वादविवाद झाला. नाशिक महापालिकेने कश्यपी धरणाच्या पाण्याची गरज नसल्याचे कळविले असल्यामुळे कश्यपीचे पाणी कोणासाठी सोडले जात आहे, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला. ज्यांच्यासाठी पाणी सोडले जात आहे, त्यांनी प्रश्न सोडवावेत व मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेतली. त्यावर जिल्हाधिका-यांचे आदेश असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता, जिल्हाधिकाºयांना धरणावर बोलवा, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतीला पाटबंधारे खात्याने पत्र द्यावे, असे ठरलेले असताना अचानक पाणी सोडण्याचा उद्देश काय असा सवाल केला

Web Title: Kashyapi was beaten by the officials who left the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.