कळवण तालुक्यात प्रत्येक मत ठरले मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 07:27 PM2019-06-24T19:27:16+5:302019-06-24T19:28:11+5:30

कळवण : कळवण तालुक्यातील १० ग्रामपंचायतच्या सरपंचसह सदस्याच्या ९० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चणकापूर व तिºहळ खुर्द येथील थेट सरपंचासह चणकापूर, तिºहळ खुर्द, हिंगवे, खिराड, शिंगाशी, वेरु ळे, सुपलेदिगर, खडकवन, सुकापूर, गोपाळखडी येथील ५९ जागासाठी स्थानिक पातळीवर समझोता एक्स्प्रेसचे राजकारण यशस्वी झाल्याने त्या जागा बिनविरोध निवडीची परंपरा तालुक्यात टिकून राहिली.

In Kalwan taluka, every vote was made | कळवण तालुक्यात प्रत्येक मत ठरले मोलाचे

चणकापूर सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी नेते ज्ञानदेव पवार यांच्यासह बिनविरोध झालेले ग्रामपंचायत सदस्य.

googlenewsNext
ठळक मुद्देचणकापूर, तिºहळ खुर्द सरपंच बिनविरोध, ५९ ग्रामपंचायत सदस्य जागा बिनविरोध

कळवण : कळवण तालुक्यातील १० ग्रामपंचायतच्या सरपंचसह सदस्याच्या ९० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चणकापूर व तिºहळ खुर्द येथील थेट सरपंचासह चणकापूर, तिºहळ खुर्द, हिंगवे, खिराड, शिंगाशी, वेरु ळे, सुपलेदिगर, खडकवन, सुकापूर, गोपाळखडी येथील ५९ जागासाठी स्थानिक पातळीवर समझोता एक्स्प्रेसचे राजकारण यशस्वी झाल्याने त्या जागा बिनविरोध निवडीची परंपरा तालुक्यात टिकून राहिली.
जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थकांचा विजय झाला. तर आमदार जे. पी. गावित यांचे कट्टर समर्थक भरत शिंदे यांच्या पत्नींला हिंगवे ग्रामपंचायतमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
चणकापूरच्या सरपंचपदी कळवण बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार, तिºहळ खुर्दच्या सरपंचपदी गुलाबबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली. ७ ग्रामपंचायतीत सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत ९ जागा बिनविरोध झाल्या.
अभोणा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत मनोज वेढणे यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुनील खैरनार यांचा पराभव करून विजय मिळविला. ९० जागांपैकी १५ जागांवर नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने त्या जागा रिक्त झाल्या असून ८ ग्रामपंचायतच्या थेट सरपंचसह ८ सदस्यपदासाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी (दि.२४) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सकाळी मतमोजणी झाली.
८ ग्रामपंचायतच्या थेट सरपंच व सदस्यपदाच्या ८ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत नवोदितांना संधी देत मातब्बरांना मतदारांनी धूळ चारली. १५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने जागा ह्या रिक्त राहील्याने कळवण तालुक्याला पुन्हा पोटनिवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे.
कळवण तालुक्यात झालेल्या १० ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वाधिक समर्थक निवडून आले आहेत . यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने गावागावातील आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी व सत्तेसाठी पुन्हा गावपातळीवरील नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली होती.
८ ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदासाठी चुरशीच्या झालेल्या लढतीत नवोदित चेहरे व सुशिक्षीत उमेदवार व मातब्बरांना मतदारांनी पुन्हा संधी देऊन गावाचा कारभार हाती सोपविला. त्यात हिंगवे सरपंचपदी कैलास बागुल, खिराड सरपंचपदी वामन चौधरी, शिंगाशी सरपंचपदी नामदेव भोये, वेरु ळे सरपंचपदी कमलाकर बागुल, सुपलेदिगर सरपंचपदी विमल महाजन, खडकवन सरपंचपदी रेखा कोल्हे, सुकापूर सरपंचपदी लता दळवी, गोपाळखडी सरपंचपदी बेबीबाई वाघ यांचा विजय झाला.
हिंगवे ग्रामपंचायतच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत हिंगवे ग्रामपंचायतमध्ये निलेश बागुल, रामभाऊ पवार, सुरेश राऊत, शरद आहेर जिजाबाई गांगुर्डे, कोमल पगार तर तिºहळ खुर्दच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कृष्णा चव्हाण व अभोणा ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मनोज संजय वेढणे यांनी विजय मिळविला.
बिनविरोध झालेले उमेदवार हिंगवे ग्रामपंचायतमध्ये सविता थैल, राजूबाई चौरे, खिराड ग्रामपंचायमध्ये नीलिमा चौधरी, योगेश जोपळे, पुष्पा भोये, रामचंद्र पवार, कौशल्या बस्ते, मोहनाबाई मेघा.
शिंगाशी ग्रामपंचायतमध्ये बेबीबाई गावित, गंगुबाई पवार, मन्साराम पवार, काशीराम गावित वेरु ळे ग्रामपंचायतमध्ये मंदा पवार, उगलाल कोल्हे, राणी पवार, राजेंद्र बर्डे, संदीप कुवर, अनिता महाले, कौशल्या कुवर तिºहळ खुर्द ग्रामपंचायतमध्ये गुलाबाई बागुल. कमलाकर बागुल, शांतीलाल बागुल.
चणकापूर ग्रामपंचायतमध्ये लखन भोये, ज्योती महाकाळ, जिजा पवार, प्रवीण पवार, रावजी महाकाळ, स्नेहल भोये, उत्तम पवार, भारती पवार, जिजाबाई पवार.
सुपलेदिगर ग्रामपंचायतमध्ये सोमनाथ चौरे, शांताराम पवार, सताबाई पवार, इंद्राबाई चौरे, दिलीप चौरे, खडकवनग्रामपंचायतमध्ये रवींद्र कुवर, शांताराम जगताप, निर्मला चौरे, अलका कुवर, जगन पाडवी, कैलास पवार, लक्ष्मीबाई जगताप बिनविरोध निवडून आले आहे.
सुकापूर ग्रामपंचायतमध्ये गोपाळ दळवी, चागुणाबाई गायकवाड, चेतन पवार, लताबाई गायकवाड, हेमलता दळवी, सुदाम पवार, यमुनाबाई बोरसे गोपाळखडी ग्रामपंचायतमध्ये काशिनाथ वाघ, बेबीबाई वाघ, रंजना बागुल, गुलाब बर्डे, नंदू बंगाळ, मिना चौधरी, पंढरीनाथ गांगुर्डे, सुमित्रा साबळे यांची बिनविरोध निवड झाली.

पोटनिवडणुकीत बिनविरोध झालेले सदस्य गोविंदा बागुल (देसगाव) प्रतिभा बहीरम (करभेळ) रेखा चव्हाण (मोहनदरी) नंदू बागुल (सरलेदिगर) मंदा बागुल (सरलेदिगर प्रभाग २ व ३) सोनी बागुल (जयदर प्रभाग १ व ३) विजय भोये (ओझर)
 

Web Title: In Kalwan taluka, every vote was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.