निफाड शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास भारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:24 PM2019-07-01T13:24:19+5:302019-07-01T13:25:11+5:30

निफाड : तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास रघुनाथ भारती तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब रंगनाथ सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 Kailash Bharti, President of Nifed Teachers Staff Credit Society | निफाड शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास भारती

निफाड शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास भारती

Next

निफाड : तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास रघुनाथ भारती तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब रंगनाथ सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पतसंसंस्थेचे मावळते अध्यक्ष साहेबराव बर्डे आणि उपाध्यक्ष गणेश महाले यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागांसाठी ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक संपन्न झाली. भारती यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून साहेबराव बर्डे तर अनुमोदक म्हणून संतोष बिर्हाडे यांची नावे होती तर उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब सोनवणे यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून सुजाता कुशारे व अनुमोदक म्हणून सतीश पवार यांची नावे होती अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अनुक्र मे भारती आणि सोनवणे यांचे एकेक नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

Web Title:  Kailash Bharti, President of Nifed Teachers Staff Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक