शेतकºयांची दिशाभूल थांबविण्यासाठी जनजागृती समृद्धी : राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:28 AM2017-11-08T01:28:48+5:302017-11-08T01:28:48+5:30

राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Janajagruti Prosperity to stop misunderstandings of farmers: Decision in state level meeting | शेतकºयांची दिशाभूल थांबविण्यासाठी जनजागृती समृद्धी : राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

शेतकºयांची दिशाभूल थांबविण्यासाठी जनजागृती समृद्धी : राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

Next

सिडको : राज्य सरकारकडून समृद्ध महामार्गासाठी जागेचे कोणतेही दर जाहीर न करता शेतकºयांकडून बळजबरीने त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घातला असून, यात कोणतीही पारदर्शकता नसतांनाही शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मंगळवारी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दहा जिल्ह्यांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. यात बुधवारपासून (दि.८) जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे समन्वयक राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अश्विननगर येथील मानव सेवा केंद्रात बैठक घेण्यात आली. या बैठकीस समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे दहा जिल्ह्यांतील सुमारे ६५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, यात येणाºया अडचणींबाबत तसेच नियोजनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास बहुतांशी शेतकºयांचा विरोध असून, सरकार मात्र शेतकºयांची दिशाभूल करून जमिनी ताब्यात घेण्याचा घाट घालत आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार ७० टक्के शेतकºयांची संमती असल्याशिवाय जमिनीची खरेदी करू नये असे असतानाही सरकार मात्र सर्व नियम धाब्यावर बसवित जमिनी ताब्यात घेत असल्याबद्दल बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. जमिनी ताब्यात घेतांना शेतकºयामंध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. समृद्धी महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारची धडपड सुरु असून पेसा अंतर्गत १९ गावे येत असून समृध्दीला जमीन द्यायची नाही असा ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे.परंतु यानंतरही तेथील जमिनी खरेदी करण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु असल्याचेही यावेळी राजू देसले यांनी सांगितले.विशेष म्हणजे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून या सर्व याचिका एकत्र लढविण्यासाठी समितीचे प्रयत्न सुरु आहे त.दुसरीकडे प्रकरण न्यायालयात गेलेले असतांनाही जमिनी खरेदी करण्यात येत असल्याबाबतही बैठकीत निषेध नोंदविण्यात आला.याप्रसंगी सोमनाथ वाघ,शांताराम,ढोकणे,अ‍ॅड.रतनकुमार इचम,भास्कर गुंजाळ,सदानंद वाघमारे,तुकाराम भस्मे,अ‍ॅड.एल.एम,डांगे आदी उपस्थित होते.
राज ठाकरेंची भेट घेणार
समिती ही कोणत्याही पक्षाशी निगडीत नसून समृद्धीसाठी जे राजकीय पक्ष सहकार्य करतील त्यांच्याकडेही जाऊन दाद मागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या दहा नोव्ेंहबर रोजी नाशिक दोैºयावर येत असून समिती प्रतिनिधी याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Janajagruti Prosperity to stop misunderstandings of farmers: Decision in state level meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.