लोककलेचे जतन करणे आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:23 AM2019-01-22T01:23:06+5:302019-01-22T01:23:34+5:30

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती विविध कलांची खाण आहे. आज काळाप्रमाणे खूप बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत या पारंपरिक लोककलांचे जतन करणे आव्हानात्मक ठरत असून, जतन करणे आजची गरज आहे,

 It's challenging to save the folklore | लोककलेचे जतन करणे आव्हानात्मक

लोककलेचे जतन करणे आव्हानात्मक

Next

नाशिक : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती विविध कलांची खाण आहे. आज काळाप्रमाणे खूप बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत या पारंपरिक लोककलांचे जतन करणे आव्हानात्मक ठरत असून, जतन करणे आजची गरज आहे, असे मत मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.  कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चंदनशिवे बोलत होते. व्यासपीठावर मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, माजी नगरसेवक अश्विनी बोरस्ते, बाळासाहेब सोनवणे, बाबा जगदाळे, संजय भामरे, सुनील जगताप, संतोष सोनपसारे, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापक कल्पना सोनवणे, प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सोनखासकर यांनी केले. त्यांनी भारतीय परंपरा, संस्कृती आणी आजची गरज याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात संचालक नानासाहेब महाले यांनी सिडको परिसराची पार्श्वभूमी विशद करतानाच मध्यमवर्गीय मुले येथे शिस्तीने शिकत असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ घुले यांनी केले.
परिचय शंकर बोºहाडे यांनी करून दिला. याप्रसंगी एच. एम. पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. राहुल पाटील आदी उपस्थित होते. आभार राजेश झनकर यांनी मानले.
जागरण-गोंधळ
डॉ. चंदनशिवे यांनी सहकाऱ्यांसह लोककलेचे विविध पैलू सादर केले. भूत जबर मोठं गं बाई, सोन्याची देवी गोंधळा ये, नेलं साठवलेलं गठुडं बया, आई गं अंबाबाई हाकेला माझ्या धाव आदी गोंधळ व भारुड सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा यांसह चित्रपटातील गीत सादर केले. अमित शिंदे यांच्या संबळ वादनाला आणि शाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याला विशेष प्रतिसाद मिळाला.

Web Title:  It's challenging to save the folklore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक