आविष्कार : कुबडीसह खुर्चीची संकल्पना दोघा युवकांनी बनविली अपंगांसाठी ‘चेअरक्रच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:32 AM2018-06-01T01:32:30+5:302018-06-01T01:32:30+5:30

Inventions: The concept of a chair with a hunchback is made by two youths 'Chaircratch' | आविष्कार : कुबडीसह खुर्चीची संकल्पना दोघा युवकांनी बनविली अपंगांसाठी ‘चेअरक्रच’

आविष्कार : कुबडीसह खुर्चीची संकल्पना दोघा युवकांनी बनविली अपंगांसाठी ‘चेअरक्रच’

Next
ठळक मुद्देदिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊकुबडीप्रमाणे एक खुर्ची असायला हवी, असा विचार

नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगुरू व आशिष उगले असे या युवकांचे नाव आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोधाचा दिव्यांगांना मोठा लाभ होऊ शकतो. तसेच दिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊ शकेल.
चेअरक्रचची कल्पना कशी सुचली याची माहिती देताना राजगुरू म्हणाले की, रस्त्याने जाताना एक वयोवृद्ध दिव्यांग महिला कुबडीसह पडली असता तिला हात देऊन उठविले. परंतु तिला बसवावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच माझा मित्र आशिष उगले हादेखील दिव्यांग असल्याने समस्यांची जाणीव झाली. त्यातून आम्ही दोघांनी दिव्यांगासोबत कायमस्वरूपी कुबडीप्रमाणे एक
खुर्ची असायला हवी, असा विचार करून उपकरण तयार करण्याचे ठरविले.
कुबडीच खुर्ची करावी या संकल्पनेतून ‘चेअरक्रच’ची निर्मिती केली. त्यापूर्वी अनेक दिव्यांग बांधव व भगिनींना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. चेअरक्रच खुर्चीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अ‍ॅडजेस्टेबल
आहे. दिव्यांगाच्या उंची कमी जास्त करता येते. त्याचबरोबर सुमारे ९० किलो वचनाची व्यक्तीही त्यावर बसू शकते.

Web Title: Inventions: The concept of a chair with a hunchback is made by two youths 'Chaircratch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.