शिक्षकांना सेवापुस्तक सादर करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:28 AM2019-03-23T00:28:36+5:302019-03-23T00:28:58+5:30

शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडताळणी झालेली नाही.

 Instructions for submitting service books to teachers | शिक्षकांना सेवापुस्तक सादर करण्याच्या सूचना

शिक्षकांना सेवापुस्तक सादर करण्याच्या सूचना

Next

नाशिक : शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या लेखाधिकाऱ्यांनी सर्व संबंधिताना त्यांची सेवापुस्तके २५ मार्चपर्यंत पडताळणीसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.  नाशिक शिक्षण विभागाच्या लेखाधिकाºयांनी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना शनिवारी (दि.१६) लिखित पत्राद्वारे त्यांच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची सेवापुस्तके सादर करण्यासाठी सूचित केले आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू झाली असून, त्यानुसार शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयामार्फ त वेतन पडताळणीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्याचे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार होणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सर्व मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची मूळ सेवापुस्तके वेतन पडताळणीसाठी २५ मार्च २०१९ पर्यंत लेखाधिकारी कार्यालयास सादर केल्यास ३१ मार्चअखेरपर्यंत पडताळणीचे काम करणे शक्य  आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते प्रदान करणे सोयीचे होणार असल्याचे शिक्षण खात्याच्या लेखाधिकाºयांनी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सेवापुस्तकेसाठी लगबग सुरू
मूळ सेवापुस्तिका सादर करण्याच्या व पडताळणीच्या प्रक्रियेत विलंबामुळे वेतन आयोगाच्या लाभासाठीही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची सेवापुस्तके अद्ययावत करण्याची लगबग सुरू आहे.

Web Title:  Instructions for submitting service books to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.