कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:39 AM2018-03-02T01:39:44+5:302018-03-02T01:39:44+5:30

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली.

Initiative for the month beginning from the date of the loan waiver scheme: Farmers should take advantage of the benefits | कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next
ठळक मुद्देदीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून काही कारणास्तव वंचित राहिलेल्या शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, गुरुवारपासून त्याची बॅँकांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर मुदत असलेल्या या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर केली होती. त्यासाठी कर्जदार शेतकºयांकडून २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.
वीजपुरवठा, इंटरनेटची उपलब्धता आदी कारणांमुळे अनेक शेतकºयांना मुदतीत आॅनलाइन अर्ज सादर करता न आल्याने ते या योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार केली गेली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत त्यांच्यासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आता शेतकरी पुन्हा अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी आॅनलाइन ही पूर्वीच्याच पद्धतीचा वापर करण्यात येणार असून, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात येणार
आहे. अर्ज करणाºया शेतकºयांना आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, रेशन कार्ड आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत.

Web Title: Initiative for the month beginning from the date of the loan waiver scheme: Farmers should take advantage of the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी