भारतातील युवा पिढी राष्ट्राचा आधारवड- स्नेहलता देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:33 PM2019-06-28T16:33:01+5:302019-06-28T16:35:22+5:30

राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले

India's young generation is the basis of the nation - Snehlata Deshmukh | भारतातील युवा पिढी राष्ट्राचा आधारवड- स्नेहलता देशमुख

भारतातील युवा पिढी राष्ट्राचा आधारवड- स्नेहलता देशमुख

Next
ठळक मुद्देराष्ट्राची प्रगती युवा पिढीची जबाबदारी युवा पिढीने वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात स्नेहलता देशमुख यांचे विद्यर्थींनींना मार्गदर्शन

नाशिक :  राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले. 
एसएमआरके महिला महाविद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.२८) साजरा करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोखले एजुकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह व्यासपीठावर साहित्यिक संजय कळमकर, प्राचार्य राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदि उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना स्नेहलता देशमुख यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीने आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही येण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहूणे साहित्यिक संजय कळमकर यांनी विद्यार्थिनींना वाचनातून आपले अनुभव समृध्द करण्याचा सल्ला देतानाच पुस्तकांना आपले जिवलग मित्र बनवून चांगल्या पुस्तकाचा संग्रह करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व सांगताना उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचा वार्षिक अंक शतरूपा’ संशोधनात्मक प्रबंधांचा संग्रह ‘इम्प्रेशन्स’ तसेच महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाच्या ई-प्रोसेडींगचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य साधना देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रसिका सप्रे, स्नेहा रत्नपारखी, व प्रा. निलेश रोटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. कविता पाटील यांनी मानले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. डी. के. गोसावी, प्रा. बी. देवराज, उद्योजक नीलिमा पाटील,  उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकील विद्यार्थिनी सभेच्या प्रमुख डॉ. कविता खोलगडे, प्रा. सुरेखा जोगी आदी उपस्थित होते. 

गुणवंतांचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थिनींचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया प्राचार्य, प्राध्यापक यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.
 

Web Title: India's young generation is the basis of the nation - Snehlata Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.