महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:35 PM2018-10-14T18:35:20+5:302018-10-14T18:36:32+5:30

मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन जे. ए. टी. महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सलमा सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले

Inauguration of Social Science Board in Women's College | महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन

महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन

Next

मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन जे. ए. टी. महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सलमा सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सौ. उज्ज्वला एस. देवरेहोत्या. प्राचार्य देवरे यांनी सामाजिकशास्त्राची ओळख व जाण ठेवणे, व्यक्तिमत्व विकासाचे महत्वपूर्ण प्रक्रिया असून भूतकाळातील गोष्टी देखील आधुनिक जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. त्यामुळे या घटनांकडे तार्कीक दृष्टीकोनातून बघून त्या प्रतिकांना योग्य अर्थाने मानवी कल्याणासाठी फायद्याचे ठरू शकते, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. डॉ. सलमा सत्तार यांनी व्याख्यानात सामाजिकशास्त्रांची योग्य सांगड घालून ते एकमेकांस पूरक असे आहेत याची माहिती दिली.सामाजिकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. अरुण शिंदे यांनी प्रास्ताविकात सामाजिकशास्त्र मंडळाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. डी. पगार यांनी केले तर आभार डॉ. रमेश निकम यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Inauguration of Social Science Board in Women's College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला