अतिदुर्गम हेदपाडा टंचाईमुक्त,सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे पाणी प्रकल्प ग्रामस्थांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:35 IST2018-01-08T14:35:31+5:302018-01-08T14:35:50+5:30
त्र्यंबकेश्वर -सोशल नेटवर्किग फोरम या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियान अभियानातील आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायत अंतर्गत हेदपाडा ह्या पाडयावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला.

अतिदुर्गम हेदपाडा टंचाईमुक्त,सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे पाणी प्रकल्प ग्रामस्थांकडे सुपूर्द
त्र्यंबकेश्वर -सोशल नेटवर्किग फोरम या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियान अभियानातील आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायत अंतर्गत हेदपाडा ह्या पाडयावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते नळ चालू करून पाणी प्रकल्पाचे उद्घाटन केले.
शहरातील तरूणांनी समाजमाध्यमांवर एकत्र येवून लोकसहभाग आणि गावकºयांच्या मदतीने जिथे गाडी पोहोचू शकत नाही, मोबाईलची रेंज नाही अशा अतिदूर्गम भागातील आठ गावांना टँकरमुक्त करावे ही सोशल मिडीयाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे असे प्रतिपादन सहस्त्रबुद्धे यांनी केले.फोरमचे काम बघून पुढील प्रकल्पांमध्ये शासकीय स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ.पंकज भदाणे, डॉ. जयदीप निकम, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, इंजि.प्रशांत बच्छाव, राहुल गाडगीळ, व्यवस्थापक सचिन शेळके, स्वामी श्रीकंठानन, समाधान बोडके, विनायक माळेकर, विस्तार अधिकारी डी.एच. राठोड, डॉ. संदिप आहिरे, सरपंच कल्पना जाधव, मुरलीधर चितेकर, परशराम फसाळे, जयवंत जाधव, मीराबाई कर्डल, गोपाळ उघडे, सुरेश दहीवाड, तुकाराम सापटे, निवृत्ती सापटे, भूषण लोहार, यांच्यासह तोरंगण, हेदपाडा परिसरातील ग्रामस्थ , माहिला मोठया संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर ग्रामसेवक सचिन पवार यांनी आभार मानले.