हिरे यांच्यासह खैरनार बंधूंवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:10 PM2017-12-20T16:10:00+5:302017-12-20T16:10:22+5:30

मालेगाव : राजकीय पूर्ववैमनस्यातून युवा सेनेचे राहुल गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश (विकी) खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद (लकी) खैरनार, रोहित भामरे या चौघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Heare and lodged a complaint against the Khairnar brothers | हिरे यांच्यासह खैरनार बंधूंवर गुन्हा दाखल

हिरे यांच्यासह खैरनार बंधूंवर गुन्हा दाखल

Next

मालेगाव : राजकीय पूर्ववैमनस्यातून युवा सेनेचे राहुल गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश (विकी) खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद (लकी) खैरनार, रोहित भामरे या चौघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बीएसएनएल कार्यालयासमोर ६० फुटी रस्त्यावर हा हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी जखमी गायकवाड याने छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड हा कट्ट्यावर बसलेला असताना कारमधून आलेल्या अद्वय हिरे, गणेश खैरनार, प्रसाद खैरनार, रोहित भामरे यांनी शिवीगाळ केली, तसेच गायकवाड याच्या गळ्यातील सोन्याची साखळीही हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळते करीत आहेत. दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या गायकवाड याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
संशयितांच्या अटकेची शिवसेनेकडून मागणी
युवा सेनेचे राहुल गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत संशयित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी प्रांत अधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन केली आहे. मारहाण प्रकरणातील संशयित अद्वय हिरे, गणेश खैरनार, लकी खैरनार, रोहित भामरे यांना तातडीने अटक करावी, या मागणीचे निवेदन प्रांत अधिकाºयांना देण्यात आले आहे. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने, शहरप्रमुख रामा मिस्तरी, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, संचालक बंडूकाका बच्छाव, नगरसेवक नारायण शिंदे, राजाराम जाधव, जे. पी. बच्छाव, भीमा भडांगे, विनोद वाघ, सुनील चांगरे, मनोहर बच्छाव, तानाजी देशमुख, राजू शेवाळे, दिलीप बच्छाव, संभाजी शेवाळे आदींसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Heare and lodged a complaint against the Khairnar brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक