अभिव्यक्त होण्याचा अधिकार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:20 AM2017-09-25T00:20:23+5:302017-09-25T00:20:27+5:30

वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मुलींनी अपप्रवृत्तींविरोधात कुटुंबातही तक्रार केली तर त्यांना रस्ता बदलून दुसºया रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने अपप्रवृत्तींना बळ मिळत जाऊन चोहोबाजूला त्या फोफावतात. अशा अपप्रवृत्तींविरोधात तसेच समाजातील वेगवेगळ्या अविचारी आणि संभ्रमित करणाºया घटनांविरोधात कुटुंबात, मित्र-मैत्रिणींमध्ये आणि समाजातही मोकळेपणाने बोलण्यासाठी युवा पिढीला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असल्याचा सूर राज्यस्तरीय युवा संमेलनात उमटला.

Have the right to express | अभिव्यक्त होण्याचा अधिकार हवा

अभिव्यक्त होण्याचा अधिकार हवा

googlenewsNext

नाशिक : वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मुलींनी अपप्रवृत्तींविरोधात कुटुंबातही तक्रार केली तर त्यांना रस्ता बदलून दुसºया रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने अपप्रवृत्तींना बळ मिळत जाऊन चोहोबाजूला त्या फोफावतात. अशा अपप्रवृत्तींविरोधात तसेच समाजातील वेगवेगळ्या अविचारी आणि संभ्रमित करणाºया घटनांविरोधात कुटुंबात, मित्र-मैत्रिणींमध्ये आणि समाजातही मोकळेपणाने बोलण्यासाठी युवा पिढीला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असल्याचा सूर राज्यस्तरीय युवा संमेलनात उमटला. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी विश्वास लॉन्स येथे ‘दक्षिणायन डिझाइन फ्युचर- आपली सामूहिक कृती २०१७’ या युवा संमेलनाचे दक्षिणायण अभियानचे प्रणेते डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, नंदा खरे, पन्नालाल सुराणा, सुगंध बरंठ, उल्का महाजन, विद्या बाळ, शमसुद्दीन तांबोळी, नीलेश साळगावकर, लोकेश शेवडे, जयंत जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील विविध भागातून नाशिकमध्ये दाखल झालेल्या युवक-युवतींचे वाणिज्य, व्यवस्थापन व संगणक विज्ञान महाविद्यालयात नऊ गट, वाघ गुरुजी शाळेत ६ गट व मविप्र तंत्रनिकेतनमध्ये नऊ गट अशा एकूण २४ समूहांमध्ये विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. यावेळी संमेलनात सहभाही झालेल्या युवक -युवतींनी तरुण वर्गास बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच बहुतांश मुलींना महाविद्यालयीन जीवनात होणाºया घुसमटीला वाट करून दिली. जयंत जोशी, मुक्ता चैतन्य, वीरा राठोड, राजन इंदूलकर, माधव पळशीकर, प्रशांत पवार, डॉ. मिलिंद वाघ, डॉ. रोहित कसबे, रसिका सावळे, श्यामला चव्हाण यांनी समन्वयकांची भूमिका पार पाडली.

Web Title: Have the right to express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.