वरातीला फाटा देऊन हरिनामाचा गजर करत गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:53 PM2019-05-18T12:53:30+5:302019-05-18T12:54:53+5:30

दिंडोरी : लग्न सोहळा म्हटलं की रात्री वरातीत उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तळीरामांची चांगलीच चंगळ असते. या परंपरेला फाटा देत बोपेगाव येथील कावळे परिवाराने भजन आयोजित करून हरिनामाचा गजर करत नवदाम्पत्याचा गृहप्रवेश करून समाजासमोर आदर्श निर्माण करून दिला.

Hariñamacha alarm and giving it to the house giving entry | वरातीला फाटा देऊन हरिनामाचा गजर करत गृहप्रवेश

वरातीला फाटा देऊन हरिनामाचा गजर करत गृहप्रवेश

Next

दिंडोरी : लग्न सोहळा म्हटलं की रात्री वरातीत उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तळीरामांची चांगलीच चंगळ असते. या परंपरेला फाटा देत बोपेगाव येथील कावळे परिवाराने भजन आयोजित करून हरिनामाचा गजर करत नवदाम्पत्याचा गृहप्रवेश करून समाजासमोर आदर्श निर्माण करून दिला.  बोपेगाव येथील कुलदर्शन विष्णू पाटील यांचा विवाह नागपूर ता नांदगाव येथील एकनाथ विठ्ठल पवार यांची कन्या माधुरी हिच्यासोबत शुक्रवारी मनमाड येथे पार पडला. ग्रामीण भागात विवाहाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत डिजे किंवा बँडच्या तालावर नाचत वरात साजरी करण्याची परंपरा आहे. त्या पाशर््वभूमीवर कावळे परिवाराने या अनिष्ठ परंपरेला छेद देत वरातीऐवजी गावातील भजनी मंडळीला सोबत घेऊन मध्यरात्रीपर्यंत भजन गात हरिनामाचा गजर करून नवदाम्पत्याचा गृहप्रवेश घडवून आणला. या कामी गावातील वारकरी संप्रदायाचे युवक कार्यकर्ते राहुल भागवत, दीपक कावळे, हरिदास कावळे, सोमनाथ कावळे, राहुल कावळे, संतोष वाघचौरे आदी युवकांनी पुढाकार घेऊन हा नवीन उपक्र म घडवून आणला. परिसरातून या आदर्श उपक्र माचे कौतुक होत आहे. 

Web Title: Hariñamacha alarm and giving it to the house giving entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक