दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:02 AM2019-05-12T01:02:33+5:302019-05-12T01:02:48+5:30

भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते.

 Hardiness, Harapprukha Maharaj | दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

Next

नाशिक : भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते. द्रौपदीने याचा साक्षात्कार झाल्याचे सांगत सत्कर्म आणि दातृत्वामुळेच भगवान श्रीकृष्णांनी साक्षात वस्रावतार घेऊन द्रौपदीचे वस्रहरण होत असताना अखंड वस्र प्रदान केल्याचे प्रतिपादन आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.
शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक सेवा समितीतर्फे ‘प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात शनिवारी (दि.११) तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, भक्तजणांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संकटसमयी भगवंत भक्तांच्या समीप असतो. मनुष्य कायम कोणत्या ना कोणत्या अपेक्षेसाठी परमेश्वराचे चिंतन करतो. त्यासाठी परमेश्वराची स्तुती करण्याची गरज नसते. कारण, जेव्हा प्रभूचे स्मरण केले जाते तेव्हा प्रभूची स्तुती होतच असते. मन, तन आणि शांती यांचा कोठेही शोध घ्यावा लागत नाही.
मनातील लोभातून परमेश्वराकडे मागितलेल्या गोष्टी कदापि फळास येत नाहीत. जे आपल्याला आपोआप मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title:  Hardiness, Harapprukha Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.