नाशकात डीजेबरोबरच ‘गुलाल’मुक्त विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:16 AM2018-09-23T01:16:38+5:302018-09-23T01:17:03+5:30

डीजेमुक्त, गुलालमुक्तव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचा निश्चय सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने घेतला आहे़ शहरातील प्रमुख मिरवणुकीस सकाळी ११ वाजता सुरुवात होणार

 'Gulal' free immersion along with DJ in Nashik | नाशकात डीजेबरोबरच ‘गुलाल’मुक्त विसर्जन

नाशकात डीजेबरोबरच ‘गुलाल’मुक्त विसर्जन

googlenewsNext

नाशिक : डीजेमुक्त, गुलालमुक्तव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचा निश्चय सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने घेतला आहे़ शहरातील प्रमुख मिरवणुकीस सकाळी ११ वाजता सुरुवात होणार असून, सहभागी सर्व मंडळे रात्री १२ वाजेपर्यंत श्री विसर्जनासाठी पंचवटीत पोहोचतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शनिवारी (दि़२२) पत्रकार परिषदेत दिली़
शहरातील वाकडी बारव येथून निघणाऱ्या प्रमुख मिरवणुकीत यंदा २१ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला असून, सर्व मंडळांचे श्री विसर्जन पंचवटीत वेळेत पोहोचावे यासाठी सकाळी ११ वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्याचा निर्णय महागणपती मंडळाच्या पदाधिकाºयांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणूक पर्यावरणपूरक व्हावी यासाठी प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली़ श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजे व गुलालाचा वापर केला जाणार नसून
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी जनजागृती
पोलीस आयुक्तालयामार्फत डीजेमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलालाऐवजी फुलांचा वापर, निर्माल्य कलशात जमा करणे, नदीन न टाकणे व त्याचबरोबरच आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, कॅरीबॅग किंवा थर्माकॉल यांसारख्या पर्यावरणाचा ºहास करणाºया घटकांचा वापर न करणे यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत जनजागृती केली जाणार असून, सर्वोत्कृष्ट मंडळे ठरविली जाणार आहे़

Web Title:  'Gulal' free immersion along with DJ in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.