जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:04 AM2018-11-15T01:04:01+5:302018-11-15T01:04:19+5:30

एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे.

 Grains savings of 40 thousand quintals in the district | जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

Next

नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल धान्याची दरमहा बचत होत आहे.
पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरासाठी दरमहा २९,११२ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर असून, त्यापैकी ११,२५५ मेट्रिक टन धान्याची दुकानदारांकडून उचल झाली आहे. जिल्ह्णात एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य वितरण केले जात असून, त्यांचे आधार क्रमांकही जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पॉस यंत्रातील माहितीशी लाभार्थ्यांची होणारी ओळख व आधारमुळे बोटाचे ठसे जुळत असल्याने रेशनमधून खºया लाभार्थ्यांनाच धान्य मिळू लागले आहे. परिणामी यापूर्वी होणाºया धान्याच्या उचलमध्ये कमालीची तफावत निर्माण झाल्याचे पाहून मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यातूनच धान्य शिल्लक राहात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णासाठी दोन लाख १५ हजार ८ क्विंटल नियतन मंजूर असले तरी, आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात जवळपास ४० टक्क्याहून कमीच धान्याची उचल करण्यात आली. साधारणत: जिल्ह्णाला मंजूर होणाºया एकूण धान्याच्या नियतनातून दरमहा २० टक्के धान्य शिल्लक राहात असून, त्याचे प्रमाण पाहता ४० हजार क्विंटल धान्य नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा दावा पुरवठा अधिकारी अर्जुन यांनी केला आहे.
दीड लाख लाभार्थी निवडणार
जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्य शिल्लक राहात असल्याने ते नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून तहसील पातळीवर लाभार्थी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही लाभार्थी पुढे आलेले नाहीत. शिल्लक राहणारे धान्य सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा अंदाज असल्याने येणाºया काळात लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

Web Title:  Grains savings of 40 thousand quintals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.