अंबड एमआयडीसीत मालट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:51 PM2021-07-05T12:51:27+5:302021-07-05T12:51:40+5:30

सिडको : अंबड औद्योगीक वसाहतीमध्ये एका मालवाहू ट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. या दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले; ...

A goods truck caught fire at Ambad MID | अंबड एमआयडीसीत मालट्रक पेटला

अंबड एमआयडीसीत मालट्रक पेटला

Next

सिडको : अंबड औद्योगीक वसाहतीमध्ये एका मालवाहू ट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. या दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला .
रविवारी (दि.४) दुपारी अंबड औद्योगीक वसाहतीत एका कंपनीसमोरील रस्त्यावर मालट्रकच्या ( एम एच ०४ डिएस ८०३८) वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे मालट्रकच्या कॅबिनमध्ये मोठी आग लागली होती . सिडको अग्निशमन केंद्र व अंबड अग्निशमन केंद्राचे दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेत जवानांनी आग विझविली. या आगीमध्ये मालट्रकची कॅबिन जळुन खाक झाली.

Web Title: A goods truck caught fire at Ambad MID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.