नाशिकमध्ये बसमधून उतरलेल्या शाळकरी मुलीला ‘गॅँगरेप’ची धमकी देत केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 07:28 PM2018-01-25T19:28:11+5:302018-01-25T19:38:06+5:30

शाळेतून घरी जात असलेल्या एका मुलीचा पाठलाग करुन विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक्लो चौफूलीवर घडला.

The girl was threatened with a gangrap by a bus in Nashik | नाशिकमध्ये बसमधून उतरलेल्या शाळकरी मुलीला ‘गॅँगरेप’ची धमकी देत केला विनयभंग

नाशिकमध्ये बसमधून उतरलेल्या शाळकरी मुलीला ‘गॅँगरेप’ची धमकी देत केला विनयभंग

Next
ठळक मुद्देमैत्रिणींसमवेत ती पायी आपल्या घराकडे जाताना दुचाकीस्वार संशयीत तेथे आले रोडरोमियोंनी ‘तुला गरवारे पॉर्इंट येथे उचलून घेवून जाऊ’

नाशिक : शाळेतून घरी निघालेल्या मुलीला दोघांनी दुचाकीने पाठलाग करत अडवून गॅँगरेपची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाळेतून घरी जात असलेल्या एका मुलीचा पाठलाग करुन विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक्लो चौफूलीवर घडला. याप्रकरणी दुचाकीस्वार दोघा युवकांविरूध्द विनयभंगासह पोस्को अर्थात बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्यान्वये अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत युवती आपल्या घरी रडत जाताना प्रभागाच्या नगरसेवकाशी तिची भेट झाल्याने हा प्रकार उघडकीस आला व त्या दोघा रोडरोमीयोंविरुध्द पोलीस ठाण्यात नोंद झाली. पोलिस संशयीत युवकांचा शोध घेत आहेत.
संशयित अक्षय जगताप व करण दाभाडे (दोघे रा. चुंचाळे) अशी संशयीत युवकांची नावे आहेत. अंबड औद्योगीक वसाहतीत राहणारी अल्पवयीन मुलगी बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शाळेतून परतत असतांना ही घटना घडली. शहरातील एका शाळेत शिक्षण घेणारी युवती अन्य मैत्रिणींसमवेत शहर बसने प्रवास करून एक्स्लो पॉर्इंट येथे बसमधून उतरली. मैत्रिणींसमवेत ती पायी आपल्या घराकडे जाताना दुचाकीस्वार संशयीत तेथे आले. यावेळी संशयितांनी विद्यार्थीनीला शिवीगाळ केली त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी घाबरल्या; मात्र पिडित मुलीने जाब विचारत ‘तुमची तक्रार वडिलांकडे करेल’ असे सांगितले; मात्र त्या संशयित रोडरोमियोंनी ‘तुला गरवारे पॉर्इंट येथे उचलून घेवून जाऊ’ तसेच गँगरेप करण्याची धमकी दिली. तसेच दोघांनी दुचाकीवरून उतरत विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने संशयीतांनी घटनास्थळावरून पोबारा केला. नगरसेवक भागवत काका आरोटे यांची भेट झाल्याने हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला. आरोटे यांनी मुलीची विचारपुस करत तिला धीर दिला. त्यानंतर ‘ का रडत आहे, काय झाले’ असे विचारले. त्यावेळी पिडित शाळकरी मुलीने घडलेला प्रकार कथन केला. आरोटे यांनी पोलिसांशी संपर्क साधत शाळकरी मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. महिला उपनिरिक्षक खांडवी करीत आहेत.


 

Web Title: The girl was threatened with a gangrap by a bus in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.