शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 05:07 PM2019-04-21T17:07:23+5:302019-04-21T17:07:49+5:30

नाशिक:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्सअ‍ॅन्थोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे.

 Getting Started With High School Volleyball Championship | शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धेचे प्रमुख आनंद खरे यांनी सांगितले की नाशिक जिल्हातील लहान वयाच्या मुला - मुलींना स्पर्धेचा अनुभव मिळावा, खेळाडूंची प्रगती व्हावी यासाठी यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून दरवर्षी या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे असे सांगितले


नाशिक:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्सअ‍ॅन्थोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाटनउद्योगपती सुनील फरांदे यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील,ू विजय खरोटे,नितीन क्षीरसागर, हेमंत पाटील,विजय खरोटे, बाबा शेख, किर्तीकुमार गहानकरी, प्रभाकर सूर्यवंशीआदी उपस्थित होते.
या स्पर्धेत नाशिक जिल्हातील एच. ए. एल,ओझर इगतपुरी ,घोटी, एकलहारा, याचबरोबर सेंट फ्रान्सिस, फ्रावशी अकादमी, डी. डी. बिटको, वाय. डी. बिटको, सेक्र ेड हार्ट, राज इंटरनॅशनल, रु ंगठा हायस्कुल, अभिनव शाळा, टी. जे. चव्हाण स्कुल, यशवंत. सिडको, रेणुका स्कुल अश्या ४८ संघांनी सहभाग घेतला. यावेळी .सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.
उदघाटनानंतर या दोन्ही गटाच्या सामने खेळविले गेले यामध्ये डी. डी . बिटको, टी , जे . चव्हाण फ्रावशी , सिडको, सेंक्र ेट हार्ट, सेंट फ्रान्सिस, यशवंत या मुलांच्या संघांनी तर मुलीमध्ये सिडको, वाय. डी. बीटको, सिक्र ेट हार्ट या संघानी आपले साखळी सामने जिंकून विजयी सलामी दिली .यासंघांनी बाद फेरीसाठी आपली डावेदरी पक्की केली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैभव उत्तेकर, हेमंत पाटील, मयूर भावसार, सौरभ महालकर, उमेश सेनभक्त, दीपक देवकर, ऋ षिकेश मराठे , धीरज जाधवपरिश्रम घेत आहेत. (२१व्हॉलिबॉल)

Web Title:  Getting Started With High School Volleyball Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.