नाशिकला गरुड रथ रस्त्यावरच; विश्वस्तांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:45 PM2018-09-04T12:45:52+5:302018-09-04T12:46:25+5:30

श्री काळाराम मंदिर परिसरातील भाविकांची नाराजी

The Garuda Rath on the way to Nashik; Neglect of trustees | नाशिकला गरुड रथ रस्त्यावरच; विश्वस्तांचे दुर्लक्ष

नाशिकला गरुड रथ रस्त्यावरच; विश्वस्तांचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देश्री काळाराम मंदिर परिसरातील भाविकांची नाराजी

पंचवटी /नाशिक: श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा आटोपून तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरुड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेर उभा केलेला असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाचे या रथाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्र ार स्थानिक भाविकांनी केली आहे.
गरु ड रथ उभा करण्यासाठी संस्थानची जागा असली तरी विश्वस्त मंडळाने अद्यापही हा रथ नियोजित जागेवर लावला नसल्याने तो काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा असल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे. मंदिराबाहेर उभ्या असलेल्या या रथाला काळे प्लॅस्टिक गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे. काळाराम मंदिरात भाविकांची दैनंदिन गर्दी होत असल्याने सदरचा रथ नियोजित जागेवर उभा करावा, अशी मागणी स्थानिक भाविकांनी केली.
श्रीराम नवमीनिमित्त कामदा एकादशीला श्रीराम व गरु ड रथोत्सवाची यात्रा पार पडते. या दिवशी राम व गरुड रथाची पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढली जाते. रथोत्सव यात्रा आटोपल्यानंतर रात्री उशिरा श्रीराम रथ मालवीय चौकातील नियोजित जागेवर उभा केला जातो, तर गरुड रथ हा पूर्व दरवाजाशेजारी असलेल्या उजव्या जागी उभा केला जातो; मात्र चार महिने लोटल्यानंतरही गरुड रथ काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा असल्याने तो नियोजित जागेवर उभा केलेला नाही, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाने तत्काळ दखल घेऊन मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ उभा केलेला रथ नियोजित जागेवर उभा केल्यास मंदिर परिसरात अडथळा निर्माण होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे आहे.

Web Title: The Garuda Rath on the way to Nashik; Neglect of trustees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.