कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:28 AM2018-01-13T00:28:41+5:302018-01-13T00:29:27+5:30

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.

Gaikwad's guidance to students of Youth Day Free University can be progressed through skillful education | कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देकुशल मनुष्यबळाची मोठी कमतरताकौशल्याधिष्ठित शिक्षणची आवश्यकता

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. जगात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर भविष्यातील आव्हाने लक्षात घेता भावी पिढीला कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. केवळ बरे, चांगले, उत्तम असून चालत नाही, तर ते सर्वोत्तम करण्यावर भर दिला पाहिजे. कारण सर्वोत्तम होण्यासाठी काम पूर्ण व यशस्वी करण्याचा ध्यास घ्यावा लागतो. हा विचार आजच्या तरूणांनी केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘झुंजा अन् झुंजत पुढे चला’ हे विवेकानंदांचे वाक्य वाचनात आल्याने आयुष्यालाच कलाटणी मिळाली, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी यावेळी ‘बीव्हीजी’ कार्यरत असलेल्या औैषधे, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांत ‘बीव्हीजी’ने पदार्पण केल्याचे सांगतानाच राज्यात लवकरच उच्च दर्जाचा फूडपार्क उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Gaikwad's guidance to students of Youth Day Free University can be progressed through skillful education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.