पत्र्याच्या शेडवर  भिंत कोसळल्याने चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:52 AM2018-08-21T00:52:23+5:302018-08-21T00:52:44+5:30

जेलरोड दसक सद्गुरू मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत पार्किंगच्या जागेत अनाधिकृत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मंगल कार्यालयाच्या मालकासह चौघे जण जखमी झाले आहे.

Four people injured in wall collapse | पत्र्याच्या शेडवर  भिंत कोसळल्याने चौघे जखमी

पत्र्याच्या शेडवर  भिंत कोसळल्याने चौघे जखमी

Next

नाशिकरोड : जेलरोड दसक सद्गुरू मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत पार्किंगच्या जागेत अनाधिकृत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मंगल कार्यालयाच्या मालकासह चौघे जण जखमी झाले आहे. मंगल कार्यालयात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुरू असतांना घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळ व धावपळ उडाली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जेलरोड दसक चौफुली लगत असलेल्या गुरूकृपा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजुस सद्गुरू मंगल कार्यालय असून त्या ठिकाणी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून जेलरोड अमृतनगर दिप्ती रोहाऊस येथे राहाणारे नाना रामभाऊ पानसरे यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रमानिमित्त हभप रेखाताई हांडगे यांचे प्रवचन सुरू होते. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमास सुमारे २०० ते २५० नातेवाईक, महिला, नागरिक उपस्थित होते. कार्यालयाच्या पाठीमागील एका कोपऱ्यास जेवण बनविण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार होती.  दरम्यान मंगल कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील आडव्या बिमवर मजुरांकडून भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी कार्यालय मालक राजेंद्र रामचंद्र डेर्ले हे देखील उपस्थित होते. पावणेबाराच्या सुमारास अचानक मंगल कार्यालयावर बांधण्यात येणारी भिंत खाली पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने मोठा आवाज होत पत्र्याचे शेड, अ‍ॅँगल सर्व जमीनदोस्त झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे वर्षश्राद्धास उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांची धांदल उडून धावपळ झाली. यामध्ये कार्यालय मालक राजेंद्र डेर्ले हे देखील वरतुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. तर खाली पत्र्याचे शेड कोसळल्याने स्वयंपाक काम करणारे वाल्मीक जनार्दन शेलार (वय २७) रा. शेरकर वाडा जुने नाशिक, संतोष दगडाची चावरे (वय ३२) रा. चेतनानगर राणेनगर, नाशिक हे दोघे जखमी झाले. तर वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमास आलेले प्रेस कामगार शैलेश जाधव हे देखील जखमी झाले असून त्यांच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. या दुर्घटनेनंतर जखमींना तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सदर घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजेश आढाव, माजी नगरसेवक अशोक सातभाई, गोटू आढाव, राम वाघ आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन वर्षश्राद्धाला उपस्थित असलेल्यांना धीर दिला.
चौकशी करून गुन्हा दाखल करणार
नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे प्रभाकर रायते यांनी पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेतली. तर मनपा अग्निशामक दलाचे जवान देखील मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. सद्गुरू मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेमधील अनाधिकृत पत्र्याचे शेड मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने चार वर्षापूर्वीच जमीनदोस्त केले होते. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दिली.

Web Title: Four people injured in wall collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक