नाशिकच्या पाचशे मुलांनी शाडू मातीपासून बनविले पर्यावरणस्नेही बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:21 PM2018-09-04T12:21:23+5:302018-09-04T12:24:31+5:30

प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Five hundred children from Nashik have been created from bamboo soil, and also have an eco-friendly environment | नाशिकच्या पाचशे मुलांनी शाडू मातीपासून बनविले पर्यावरणस्नेही बाप्पा

नाशिकच्या पाचशे मुलांनी शाडू मातीपासून बनविले पर्यावरणस्नेही बाप्पा

Next
ठळक मुद्देशाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळानाशिकमध्ये पाचशे मुलांनी घडविले पर्यावरणस्नेही बाप्पापर्यावरण रक्षणासाठी ‘रोटरी' क्लब चा उपक्रम

नाशिक : प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत नाशिक शहरातील सुमारे पाचशे मुलांनी पर्यावरणस्नेही बाप्पा घडविले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला. नाशिकमधील कार्यशाळेतील सूत्रबध्द मार्गदर्शनामुळे अनेकांनी गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला. सुमारे चार तास ही कार्यशाळा चालली. उपस्थितांच्या मनातील मूर्ती घडविण्याबाबतची भीती दूर करीत डॉ.  मार्गदर्शकांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. गणपतीच्या मूर्तीचा बेस कसा बनवायचा,  पाय कसे तयार करायचे, पोट कसे तयार करायचे, पोटाचा आकार कसा द्यायचा, हात कसे बनवायचे, वरच्या मध्यभागी सोंडेचा आकार कसा द्यायचा, याबाबत अत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले. शाडू मातीमध्ये पाणी किती प्रमाणात मिसळावे, आकार देताना माती किती म‌िळून घ्यावी यासह हात, पाय, कान यांचे विविध आकार कशाप्रकारे तयार करावेत याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यामुळे  बाजारात मिळणा‍ऱ्या गणेश मूर्तीप्रमाणेच आकर्षक मूर्ती आपणही बनवू शकतो असा आत्मविश्वास मुलांच्या चेहऱ्यावर कार्यशाळेनंतर दिसत होता. गणपती तयार करताना तो उजव्या सोंडेचा आहे का डाव्या सोंडेचा हे कसे ओळखायचे याविषयीही यावेळी मार्गदर्शन केले.
अनेकांना आपल्या हातून नेमकी कशी मूर्ती घडेल, याची अनेकांना भीती वाटत होती. त्यामुळे मातीच्या गोळ्यांचे वाटप झाल्यानंतर मार्गदर्शकांनी  सर्वांना मातीच्या एका गोळ्याचे विविध आकार बनवायले लावले. ‘या मातीला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो व तो आवडला नाही तर पुन्हा बदलू शकतो’, असे सांगितले. यामुळे आपली मूर्ती कशी होईल, याची भीतीच प्रशिक्षणार्थींच्या मनातून नाहीशी झाली. आपण बनवलेल्या मूर्तीत भाव असतात. त्याच्याशी आपण नकळत एकरूप होतो. त्यामुळे आपण बनवलेली मूर्ती श्रेष्ठच असते, असेही लहानग्या मूर्तीकारांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकचित्त होऊन शाडू मातीपासून गणपतीच्या पर्यावरण मूर्ती साकारल्या. रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नाशिक शहरातील मुलांबरोबरच आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ३००  विद्यार्थ्यांनाही कार्यशाळेत सहभागी करून घेण्यात आले. यात शासकीय आश्रमशाळा वारे, आंबेगाव, धोंडेगाव, वाघेरे तसेच पुणे विद्यार्थी गृह आणि रचना शाळेच्या मुलांचा समावेश होता. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मुलामुलींना सहभागाचे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 

Web Title: Five hundred children from Nashik have been created from bamboo soil, and also have an eco-friendly environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.