राखीव वनक्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:04 AM2018-03-19T00:04:42+5:302018-03-19T00:04:42+5:30

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

Fire in reserve forest area | राखीव वनक्षेत्राला आग

राखीव वनक्षेत्राला आग

Next
ठळक मुद्देबागलाण : पश्चिम पट्ट्यातील डेरेदार वृक्ष जळून खाक वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.
गत महिनाभरापासुन हे आगीचे तांडव सुरूच असून, दररोज नवनवीन ठिकाणी राखीव वनक्षेत्राला आग लावून हे अज्ञात माथेफिरू पसार होत आहेत. गेल्या महिनाभरात दहिंदुले शिवारातील राखीव वनक्षेत्र, तताणी येथील डोंगरावरील राखीव वनक्षेत्र, दसाणा येथील राखीव वनक्षेत्र, तळवाडे येथील डोंगर राखीव वनक्षेत्र व आता डांगसौदाणे येथील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
काल सायकाळच्या सुमारास डांगसौदाणे शिवारातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीत वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींकडून लावलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने वनविभागाचे कर्मचारी, वनसंरक्षक समिती सदस्य व स्थानिक शेतकºयांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर रात्री ही आग विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत राखीव वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. राखीव वनक्षेत्रातील मोर, ससे, घोरपड हे वन्यजीव आगीपासून बचाव करण्यासाठी पळ काढतात. शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या शिकाºयांच्या जाळ्यात सापडतात. तसेच या वनक्षेत्रातील साग, बांबू, शिसव अशा वृक्षांची झालेली कत्तल लपविण्यासाठी तस्करी करणाºयांकडून राखीव वनक्षेत्राला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात जोरात आहे. मात्र याबाबत वनविभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. आग लावणाºया माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे हे अज्ञात माथेफिरू (तस्कर) बेधडक राखीव वनक्षेत्राला आग लावतात. आणि पसार होतात. यामुळे वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Fire in reserve forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.